मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये तेजस्विनी पंडितचं नावही आवर्जून घेतलं जातं. मराठी चित्रपटांमध्ये तिने साकारलेल्या भूमिकाही प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरल्या. आता तिने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. तिने निर्मिती केलेला मराठी चित्रपट आता प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. याबाबतच तेजस्विनीने एक व्हिडीओ शेअर केला आहे.
आणखी वाचा – अभिनेत्री रेशम टिपणीसवर कोसळला दुःखाचा डोंगर, आईच्या निधनानंतर भावूक होत म्हणाली, “तुझा फोन मला…”
तेजस्विनीची निर्मिती असलेल्या ‘बांबू’ चित्रपटाचा टीझर आता प्रदर्शित झाला आहे. याबाबतच तेजस्विनीने एक पोस्ट सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केली आहे. तसेच ‘बांबू’चा टीझर प्रदर्शित झाला असल्याचं तिने अनोख्या अंदाजात सांगितलं आहे.
तेजस्विनी म्हणाली, “मुलींचं फेवरेट वाक्य…तुमच्याबरोबर असं झालंय का?, मला तू खूप आवडतोस पण… आणि मग लागतात ‘बांबू’. ‘बांबू’ चा टिझर पाहिलात का..?” चित्रपटाचा टीझर पाहता हा चित्रपट एका अनोख्या प्रेमकथेवर आधारित असल्याचं दिसून येत आहे.
आणखी वाचा – ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अभिनेता होणार बाबा, बायकोने फ्लॉन्ट केला बेबी बंप
अभिनय बेर्डे, शिवाजी साटम, अतुल काळे, वैष्णवी कल्याणकर, पार्थ भालेराव, स्नेहल शिदम, समीर चौघुले यांसारख्या कलाकारांच्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. विशाल सखाराम देवरूखकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. येत्या २६ जानेवारीला हा चित्रपट बॉक्सऑफिसवर दाखल होईल.