मराठी मनोरंजनसृष्टील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडितला ओळखले जाते. आपल्या अभिनयाच्या जोरावर तेजस्विनीने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. तेजस्विनीने चित्रपटांपासून वेबसीरिजपर्यंत सर्वच क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. आतापर्यंत तेजस्विनीने साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे.

सोशल मीडियावर तेजस्विनी मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. निरनिराळे व्हिडीओ व फोटो पोस्ट करत ती चाहत्यांना अपडेट देत असते. अभिनयाबरोबरच तेजस्विनी आपल्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपले मत परखडपणे मांडत असते. आता नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमुळे तेजस्विनी चर्चेत आली आहे.

हेही वाचा- Video : रितेश देशमुखचा पत्नी जिनिलीयासह ‘त्या’ लोकप्रिय गाण्यावर भन्नाट डान्स! १८ वर्षांपूर्वीच्या आठवणींना दिला उजाळा

तेजस्विनीने आपल्या इन्स्टाग्रामवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत राज ठाकरे जातींबाबत बोलताना दिसत आहेत. ते म्हणतात, “आपण १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला भारतीय होतो. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी गेली की तो बंगाली, गुजराती, तामिळ सर्व काही होतो. मग एके दिवशी तो जेव्हा मराठा होतो तेव्हा मराठा, ब्राह्मण, कुणबी, कोळी असा सगळा होतो. ‘फादर्स डे’, ‘मदर्स डे’सारखे आपणही हे वाटून घेतले आहेत. दंगलीत ‘हिंदू डे’, १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला ‘ आम्ही भारतीय डे’, एरवी ‘मराठी डे’ आणि झालाच तर आमच्या ‘जातीचे डे.’ आपल्याला एक ठेवणारी कोणती गोष्ट असेल तर मला वाटतं ती आपली मराठी भाषा.”

तेजस्विनीने हा व्हिडीओ शेअर करत, “हा माणूस कधी कळेल महाराष्ट्राला?” अशी कॅप्शनही दिली आहे. तेजस्विनीची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. या अगोदरही तेजस्विनीने एका मुलाखतीमधून राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनावेत, अशी इच्छाही व्यक्त केली होती. आता तेजस्विनीच्या या नव्या पोस्टमुळे चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा- Video : “ती सून नव्हे तर…”, स्वानंदी टिकेकरबद्दल काय म्हणाले सासू-सासरे? अभिनेत्रीने शेअर केला लग्नातील Unseen व्हिडीओ

तेजस्विनीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर आतापर्यंत तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘तू ही रे’, ‘येरे येरे पैसा’, ‘अगं बाई अरेच्चा’ चित्रपटांतील तिची भूमिका चांगलीच गाजली. काही दिवसांपूर्वीच तिचा ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाची निर्मिती प्रसाद खांडेकरने केली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता लवकरच ती ‘स्वराज्य कनिका जिजाऊ’ या ऐतिहासिक चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ती राजमाता जिजाबाई शहाजीराजे भोसले यांची भूमिका साकारणार आहे. अभिनयाबरोबरच तेजस्विनीने निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केले आहे.

Story img Loader