अभिनेत्री तेजस्विनी पंडित सध्याची मराठी चित्रपटसृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री आहे. तिने आजवर अनेक दर्जेदार चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपटांसह ती मालिकांमध्येही झळकली आहे. ‘समांतर’ आणि ‘रानबाजार’ या दोन सुपरहिट वेब सीरिजमध्येही तिने महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. ‘अगं बाई अरेच्चा’ चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करणारी तेजस्विनी आता निर्माती बनली आहे. ‘अथांग’ या गाजत असलेल्या मराठी वेबसीरिजमुळे ती सध्या चर्चेत आहे.
तेजस्विनी पंडित हिने आतापर्यंत अनेक चित्रपटात काम केले आहे. तिची ‘अथांग’ ही वेबसीरिज काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाली. याच्या निर्मितीची जबाबदारी तेजस्विनीने घेतली आहे. ती यात कोणत्याही भूमिकेत दिसत नसली तरी या वेबसीरिजसाठी तिने पडद्यामागे अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. नुकतंच एका मुलाखतीत तेजस्विनीने मराठी सिनेसृष्टीबद्दल अनेक गौप्यस्फोट केले आहेत. याच मुलाखतीत तिने मराठी अभिनेत्रींच्या मानधनाबद्दल भाष्य केले आहे.
आणखी वाचा : “नागराज मंजुळे आकाशला…” मराठी सिनेसृष्टीतील गटबाजीबद्दल तेजस्विनी पंडित स्पष्टच बोलली
“सध्या सिनेसृष्टीत मराठी अभिनेत्रींना कमी मानधन मिळत असलं तरी त्या निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवताना दिसत आहे. अनेक अभिनेत्री या निर्माती होण्यासाठी मिळणाऱ्या मानधनाच्या जोरावर अवलंबून राहत नाहीत. त्यासाठी अनेक दुसरे पर्यायांचा ते वापर करतात. वेगवेगळ्या माध्यमातून पैसा उभा करता येतो. चित्रपट करण्यासाठी पॅशन हे लागतंच, पण त्याबरोबरच केलेली सर्व बचत यासाठी खर्ची घालायची नाही, असंही मी ठरवलंय. कारण जरी भविष्यात तोटा झाला तरी मी तो भरुन काढू शकते. तशी संधी मला मिळेल. माझ्याकडे बराच वेळ आहे. त्यामुळे मी निर्माती होण्याचा निर्णय योग्य वयात घेतलाय”, असे तिने सांगितले.
आणखी वाचा : “शिरीन ही भूमिका माझी होती, पण सई ताम्हणकरने…” तेजस्विनी पंडितचा ‘दुनियादारी’बद्दल मोठा गौप्यस्फोट
दरम्यान मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडितला ओळखले जाते. अनेक चित्रपट, मालिका, वेबसीरिज या मनोरंजनाच्या विविध माध्यमांत हटके भूमिका साकारत तेजस्विनीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तिच्या या भूमिकांचे प्रचंड कौतुकही झाले. तेजस्विनीने आता निर्माती क्षेत्रात पदार्पण केले आहे. ‘अथांग’ या गाजत असलेल्या मराठी वेबसीरिजच्या माध्यमातून सध्या ती चर्चेत आहे.