अभिनेत्री वैदेही परशुरामी आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी झाली आहे. वैदेहीने अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांत भूमिका साकारत आपला एक वेगळा असा चाहता वर्ग निर्माण केला आहे. मनोरंजनसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत तिचे नाव सामील आहे. लवकरच तिचा ‘जग्गू आणि ज्युलिएट’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ती आणि अमेय वाघ प्रमोशनसाठी फिरत आहेत.
अमेय वाघ आणि वैदेही परशुरामी ही जोडी पुन्हा एकदा पडद्यावर दिसणार आहे. वैदेहीचे आज असंख्य चाहते आहेत. अनेकांची ती आज क्रश आहे. मध्यन्तरी तिचे नाव युटूबर यशराज मुखाटेबरोबर जोडले गेले होते यावरच तिने खुलासा केला आहे. लोकमत फिल्मी या कार्यक्रमात तिला यशराजबद्दल प्रश्न विचारल्यावर ती असं म्हणाली, “मी एकदाच त्याला एक कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटली आहे.”
“मी त्या मुलाला प्रपोज…” अंकुश चौधरीच्या पत्नीने सांगितला खासगी आयुष्यातला ‘तो’ किस्सा
ती पुढे म्हणाली, “आमच्यात फक्त एक संवाद झाला होता तो म्हणजे कामाबद्दल मी त्याला सांगितले की मला तुझे काम आवडते. माझं नाव यशराज मुखातेबरोबर लिंक झाल्याने मला आनंद झाला आहे. मी त्याच्या प्रेमात नाही मी त्याला ओळखत ही नाही.” असा खुलासा तिने केला आहे.
पारंपारिक संगीताला रंजक अंदाजात बदलणारा कलाकार म्हणून यशराज मुखाटेला ओळखले जाते. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यशराज मुखाटे हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. हिंदी, मराठी मालिका, चित्रपट, बॉलिवूड, टॉलिवूड अशा सर्वच सिनेसृष्टीत त्याचे लक्ष असतं. ‘रसोडे में कोन था’, ‘पावरी हो रही’ यासारखी अनेक हिट गाणी यशराजने केली आहेत.
दरम्यान वैदेही आता ‘एक दोन तीन चार’ या नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे.हा चित्रपट एक हलकी-फुलक लव्हस्टोरी असणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून निपुण आणि वैदेही पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.