सध्या संपूर्ण महाराष्ट्रात दिग्दर्शक केदार शिंदेंचा ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. नुकतंच अभिनेत्री वैशाली भोसलेने एक पोस्ट करत याबद्दल भाष्य केले आहे.
वैशाली भोसलेने नुकतंच एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये वैशालीने अभिनेत्री अश्विनी महांगडेचे कौतुक केले आहे. अश्विनी महांगडेने शाहीर साबळे यांच्या दुसऱ्या पत्नी राधाबाई साबळे यांची भूमिका साकारली आहे. यावेळी तिने अश्विनीच्या चित्रपटातील काही दृश्यांचे फोटो पोस्ट केले आहेत.
आणखी वाचा : “हा माझा पहिला चित्रपट आणि तिचा प्रतिसाद…” सना शिंदेच्या पोस्टने वेधलं लक्ष
वैशाली भोसलेची पोस्ट
“महाराष्ट्र शाहीर…!!! हा सिनेमा बघण्याची अनेक कारणे आहेत..
खूप मोठी नावं जोडलीयेत या सिनेमासोबत..!!एव्हरेस्ट एंटरटेनमेंट, श्रेया घोषाल, संजय छाबरिया, केदार शिंदे, अजय अतुल, अंकुश चौधरी आणि अशी बरीच नावं…
या नावांमध्ये माझी मैत्रीण अश्विनी महांगडे तुझंही नावं यात झळकतंय… कौतुक आणि खूप सारं प्रेम..! प्रत्येक कलाकार स्वतःला मोठ्या पडद्यावर पहायचं स्वप्नं पाहत असतो.. तुझ हे स्वप्नं माईंच्या रुपात पूर्ण होताना पाहून खूप भारी वाटलं..एवढ्या मोठ्या कलाकृतीचा तू एक महत्त्वाचा भाग आहेस… खरं तर शब्द नाहीत म्हणता खूप भरुन आलंय यार आशू.. आय लव्ह यू.तुझी जशी एंट्री झाली तशी मी अस्वस्थ व्हायला लागले.. पोटात गोळा..छातीत धडधड.. आणि डोळ्यात खूप सारं प्रेम!!! असं वाटतं होतं जणू माझाच पहिला सिनेमा आहे.. इतकी गोड दिसलीयेस आशू तू या रुपात काय सांगू..?? आणि तितकंच कमाल काम.. मी प्रेमात पडलेय तुझ्या बरं का?
इतका उत्कृष्ट सिनेमा पाहण्याची जशी अनेक कारणे आहेत त्यात आणि एक म्हणजे माझी मैत्रीण अश्विनी महांगडे यात काम करतेय आणि ती… तीचं काम तुम्हाला नक्की मोहात पाडेल.. तिला पाहण्यासाठी.. तिला नव्याने भेटण्यासाठी.सिनेमागृहात जाऊन नक्की पहा
!!!!!महाराष्ट्र शाहीर!!!
एक सांगितिक सुखद अनुभूती”, असे वैशाली भोसलेने म्हटले आहे.
आणखी वाचा : ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट पाहिल्यानंतर प्राजक्ता माळीची पोस्ट, म्हणाली “नसेल पाहिला तर…”
दरम्यान या चित्रपटात अंकुश चौधरी, अश्विनी महांगडे यांच्याबरोबरच केदार शिंदे यांची लेक सना शिंदे देखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून तिने अभिनेत्री म्हणून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आहे. हा चित्रपट प्रेक्षकांचं मन जिंकण्यात यशस्वी ठरत आहे.