चूल आणि मुल सांभाळत स्वतःच्या पायावर उभ्या राहणाऱ्या आज कित्येक महिला त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात उत्तम काम करत आहेत. घराच्या चार भिंतींमधून बाहेर पडत आताच्या स्त्रियांनी विविध क्षेत्रात नावलौकीक मिळवलं. पण अनेकदा नेहमीच्या धकाधकीच्या जीवनात, करिअर करत असताना आपल्याला हवी ती गोष्ट करणं राहून जातं. बऱ्याच कलाकारांच्या बाबतीतही हे घडतं.

स्त्रिया नोकरी, त्यांचं काम, कुटुंबामध्ये रमतात. पण याव्यतिरिक्त त्यांनी त्यांची आवडली जोपासली पाहिजे. याबाबतच सुप्रसिद्ध अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी भाष्य केलं आहे. केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ येत्या ३० जूनला चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटाच्या टीमने ‘लोकसत्ता ऑनलाइन’च्या ‘डिजिटल अड्डा’ला हजेरी लावली होती. यावेळी “अजूनही तुमची अशी कोणती इच्छा आहे जी कामाच्या गडबडीमध्ये करायची राहून गेली? तसेच यापुढे तुम्हाला तुमची राहून गेलेली इच्छा पूर्ण करायला आवडेल का?” असा प्रश्न विचारण्यात आला.

Case against tuition teacher, tuition teacher pune,
मुलीशी अश्लील कृत्य प्रकरणी शिकवणी चालकाविरुद्ध गुन्हा
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
Rubina Dilaik Fitness Secret
Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैक पिते ताजा टोमॅटोचा ज्यूस; तज्ज्ञांनी सांगितले याचे फायदे
Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
Request to the court to quash the rape charges against the boy by the girl in Nagpur news
मुलगी न्यायालयात म्हणाली, चुकीने बलात्काराची तक्रार…आता मला भूतकाळ…
Manmohan Singh is the second Prime Minister to visit Deekshabhoomi after Atal Bihari Vajpayee
अटलबिहारी वाजपेयींनंतर दीक्षाभूमीला भेट देणारे डॉ. मनमोहन सिंग दुसरे पंतप्रधान होते
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित

आणखी वाचा – Lust Stories 2 Trailer : इंटिमेट सीन्स, बोल्ड संवाद अन्…; ‘लस्ट स्टोरी २’चा ट्रेलर पाहिलात का? नीना गुप्ता यांच्या डायलॉगची जोरदार चर्चा

त्यावेळी वंदना गुप्ते म्हणाल्या, “मी प्रत्येक टप्प्यावर थांबत गेले आणि माझ्या ज्या राहिलेल्या गोष्टी होत्या त्या मी पूर्ण केल्या. मला फॅशन डिझायनिंगची खूप आवड होती. म्हणून मी अभिनयक्षेत्रामधून दोन वर्ष ब्रेक घेतला. दोन वर्षांमध्ये माझी जी हौस होती ती मी पूर्ण करुन घेतली. त्यामधून मी पैसेही कमावले”.

आणखी वाचा – “रिक्षावाल्याने मला शिवीगाळ केली”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने भररस्त्यात त्यालाच घडवली अद्दल, म्हणाल्या, “रिक्षा पलटी केली आणि…”

“फॅशन डिझायनिंग करत असताना मी माझे ड्रेस बाहेर विकले. त्या पैश्यांमधून अमेरिकेमध्ये शिकत असलेल्या माझ्या मुलाची एक वर्षाची फी भरली. मी पैसेही कमावले, हौसही पूर्ण केली. माझी हौस भागल्यानंतर पुन्हा मी माझ्या कामाला लागले. प्रत्येक टप्प्यावर आपण सतत नवीन काही ना काही तरी केलं पाहिजे. काहीच केलं नाही तर आपण म्हातारे होत जाऊ. नवीन गोष्टी करत राहा”. वंदना यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.

Story img Loader