सेलिब्रिटी मंडळींना सर्वसामान्यांप्रमाणेच सार्वजनिक ठिकाणी विविध प्रसंगाचा सामना करावा लागतो. काही कलाकार स्वतःच्या गाडीने कामानिमित्त प्रवास करत असतात. इतकंच काय तर स्वतः गाडी चालवतात. सुप्रसिद्ध अभिनेत्री वंदना गुप्ते यांपैकीच एक आहेत. त्यांचा ‘बाईपण भारी देवा’ हा मराठी चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. याचनिमित्त त्यांनी दिलेल्या मुलाखतीत एक प्रसंग सांगितला.

केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ येत्या ३० जूनला चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटाच्या टीमने ‘लोकसत्ता ऑनलाइन’च्या ‘डिजिटल अड्डा’ला हजेरी लावली होती. यावेळी नेहमीच बाईपण भारी कसं असतं? याचा एक खरा प्रसंग वंदना गुप्ते यांनी सांगितला. त्या म्हणाल्या, “मी आधी गाडी खूप वेगाने चालवायचे. पुरुष जर गाडी चालवत असेल आणि एखादी स्त्री त्याला ओव्हरटेक करुन गेली तर पुरुषांचा अहंकार दुखावतो”.

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात

आणखी वाचा – Video : एकाच वेळी १०८ सुर्यनमस्कार, तरीही दमली नाही प्राजक्ता माळी, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “हा पुरावा…”

“एकदा मीही नाटकाचा प्रयोग झाल्यावर लिंक रोड मार्गाने माझ्या घरी जायला निघाले. सांताक्रुझ पोलिस ठाण्याजवळून सरळ गेलं की माझं घर होतं. पोलिस ठाण्याजवळच एका रिक्षावाल्याने मला डिवचलं. कारण मी त्याला ओव्हरटेक करुन पुढे निघून गेले होते. त्याने यावरुन मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मी त्याच्या रिक्षासमोरच माझी गाडी आडवी उभी केली”.

आणखी वाचा – Lust Stories 2 Trailer : इंटिमेट सीन्स, बोल्ड संवाद अन्…; ‘लस्ट स्टोरी २’चा ट्रेलर पाहिलात का? नीना गुप्ता यांच्या डायलॉगची जोरदार चर्चा

“गाडीमधून मी उतरले. रिक्षामध्ये बसलेले प्रवासीही गडबडले. मी रिक्षावाल्याला विचारलं, तू मला शिवी का दिली? तेव्हा तो स्वतःच म्हणाला, तुम्ही मला ओव्हरटेक केलं ना… मी रिक्षावाल्यासह त्यामध्ये बसलेल्या प्रवाश्यांनाही खाली उतरवलं. मला एक टेक्निक माहीत होती. तिच मी वापरली. मी रिक्षा उलटी केली आणि त्यातलं सगळं ऑईल बाहेर आलं. मी त्याच्याशी अधिक वाद घातला असता तसेच त्याला पोलिस ठाण्यातही घेऊन गेले असते. पण त्याचदिवशी रात्री माझी अमेरिकेची फ्लाइट होती. म्हणून मी त्या रिक्षावाल्याला सोडून दिलं”.

Story img Loader