विविध विनोदी भूमिकांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार. तिने ‘फु बाई फू’ आणि ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कॉमेडी शोमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून त्या घराघरात पोहोचल्या. आता विशाखा सुभेदार लवकरच एका बेधडक आणि डॅशिंग अंदाजात दिसणार आहे.
विशाखा सुभेदारने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिचा आगामी चित्रपटातील पहिला लूक शेअर केला आहे. विशाखा सुभेदार या ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटात झळकणार आहेत. यात ती बेधडक आणि डॅशिंग अंदाजात दिस आहे.
आणखी वाचा : Video : “तुम्हाला रील बनवण्याचे पैसे दिले नाही” प्रसिद्ध मराठी अभिनेत्यावर वैतागला दिग्दर्शक, कारण…
यावेळी त्यांना लेदरचं जॅकेट, हातात बंदूक आणि बॉयकट या लूकमध्ये दिसत आहेत. या चित्रपटात विशाखा यांनी ‘मगरु’ या ‘शार्प शूटर’ ची भूमिका साकारली आहे. त्यामुळे यात यात त्या ‘डॅशिंग रावडी लूक’ मध्ये दिसणार आहेत.
या भूमिकेबद्दल बोलताना विशाखाने सांगितलं की, “ही अतिशय भन्नाट व्यक्तिरेखा आहे. ग्रे शेड असलेली भूमिका साकारताना मेकअप, बॉडी लँग्वेज, एक्स्प्रेशन्स या सगळ्यांकडे खास लक्ष द्यावं लागतं. भूमिका कोणत्याही प्रकारची असली, तरी ती चांगली व्हावी यासाठी कलाकारांना कष्ट घ्यावे लागतात. एकाच इमेजमध्ये अडकून पडायचं नसल्याने ही वेगळी भूमिका स्वीकारल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.”
दरम्यान ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटात विशाखा सुभेदारबरोबर गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे, भाऊ कदम, तेजस्विनी पंडित, पॅडी कांबळे, ओंकार भोजने, प्रसाद खांडेकर, राजेंद्र शिसातकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने, सुशील इनामदार, यांसारखी दिग्गज स्टारकास्ट दिसणार आहे. विनोदी अभिनेता प्रसाद खांडेकर ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटाद्वारे तो दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे.
येत्या २४ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटर, राजेशकुमार मोहंती, दिपक क्रिशन चौधरी, सेजल दिपक पेंटर यांची असून सहनिर्मिती अश्विन पद्मनाभन, सत्यनारायण मूरथी, डॉ.झारा खादर यांची आहे.