‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र क्रेझ सुरु आहे. प्रत्येक घराघरात ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातील गाणी, डायलॉगही हिट झाले आहेत. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी-मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब या अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत. आता या चित्रपटाबद्दल सिनेसृष्टीतून विविध प्रतिक्रिया येत आहेत. नुकतंच प्रसिद्ध मराठमोळी लेखिका आणि अभिनेत्री मुग्धा गोडबोलेने याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुग्धा गोडबोले यांनी इन्स्टाग्रामवर दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. यात त्यांनी सुकन्या मोने आणि वंदना गुप्ते यांच्याबरोबरचा फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टला कॅप्शन देताना त्यांनी ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाचे कौतुक केले आहे.
आणखी वाचा : “‘बाईपण भारी देवा’मध्ये माझ्याबरोबर झळकलेली ती मुलगी…”, अखेर सोहम बांदेकरने दिले स्पष्टीकरण; म्हणाला, “आई माझ्यावर…”

“आमच्या डॉनचा चित्रपट पाहिलात की नाही? ‘बाईपण भारी देवा’. जर पाहिला नसेल तर जरुर पाहा. सर्व अभिनेत्रींचा उत्तम अभिनय. शिल्पा, सुचित्रा, रोहिणी, वंदना, दीपा आणि माझी ऑनस्क्रीन आई आणि ऑफस्क्रीन डार्लिंग सुकन्या मोने, भारी आहात तुम्ही सगळ्या. केदार शिंदे तुम्ही करुन दाखवलात. अभिनंदन”, असे मुग्धाने म्हटले आहे.

आणखी वाचा : ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात साधनाच्या सूनेची भूमिका साकारणारी अभिनेत्री कोण? जाणून घ्या

दरम्यान दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट सध्या चित्रपटाला प्रेक्षकांचा दणदणीत प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने दहा दिवसांमध्ये एकूण २६.१९ कोटींचा गल्ला जमवला आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एका दिवसात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.