छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५९ मध्ये अफझल खानाचा वध करण्यासाठी वापरलेली वाघनखं लवकरच भारतात आणली जाणार आहेत. काही दिवसांपूर्वी राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात घोषणा केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : Video : “कंजूसला इंग्रजीत काय म्हणतात?”, भन्नाट उत्तर देत जिनिलीयाने केली रितेश देशमुखची बोलती बंद, व्हिडीओ व्हायरल

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं कित्येक वर्षांपासून इंग्लंडच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये आहेत. या म्युझियमशी महाराष्ट्र सरकार करार करणार असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं होतं. याच पार्श्वभूमीवर ते गेल्या आठवड्यात लंडनाला गेले होते. वाघनखं भारतात आणण्यासाठी यशस्वी सामंजस्य करार केल्याबद्दल मराठीसह हिंदी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी सांस्कृतिक मंत्र्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.

हेही वाचा : “राज ठाकरे मुख्यमंत्री नाहीत हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, त्यांचं नाही” अभिनेत्री तेजस्विनी पंडितचं वक्तव्य

बिग बॉसच्या पहिल्या पर्वाची विजेती आणि भारतीय जनता पार्टीची सदस्य मेघा धाडेने यासंदर्भात खास पोस्ट शेअर करून सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.

मेघा धाडेची पोस्ट

छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे ब्रिटन येथून भारतात आणण्यासाठीचा सामंजस्य करार यशस्वीरित्या संपन्न केल्याबद्दल माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार (मंत्री सांस्कृतिक वनविभाग व मत्स्य विकास मंत्री) यांचा सत्कार समारंभ पर्णकुटी येथे त्यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता. यावेळी चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर कलाकारमंडळी उपस्थित होते. दिग्दर्शक सुभाष घई, महेश कोठारे, सुप्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ, शरद केळकर, संदीप कुलकर्णी, सौरव गोखले, शिव ठाकरे, माधव देवचके, भारत गणेशपुरे, नूतन जयंत, तेज सुप्रू, चित्रपट कामगार सेनेचे अध्यक्ष संदीप घुगे आणि अनेक मान्यवरांच्या हस्ते माननीय मंत्री श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचा सत्कार करण्यात आला . छत्रपती शिवरायांची वाघनखे भारतात परत आणण्यासाठीचे त्यांनी घेतलेले अथक परिश्रम व प्रयत्न यासाठी त्यांचे मनापासून आभार मानले आणि अभिनंदन केले. यावेळी सुधीर भाऊंनी चित्रपटसृष्टीसाठी घेतलेल्या अनेक नवीन योजनांची माहिती व नवनवीन योजना ज्या चित्रपटसृष्टीत अतिशय महत्त्वाच्या ठरतील अशा निर्णयांबद्दल आमच्याशी चर्चा केली. खरोखर सुधीर भाऊ महाराष्ट्राच्या प्रत्येक शिवभक्ताचावतीने व तसेच आम्हा तमाम कलाकारांच्यावतीने तुमचे मानावे तेवढे आभार थोडेच आहे पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करून मनापासून धन्यवाद म्हणते.
जय शिवराय वंदे मातरम्
मेघा धाडे

हेही वाचा : Video : माधुरी दीक्षितच्या दिलखेचक अदा, ‘झी मराठी अवॉर्ड्स’मध्ये केला जबरदस्त डान्स, नेटकरी म्हणाले…

सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेण्यासाठी आलेल्या सगळ्या कलाकारांबरोबर मेघाने फोटो शेअर केले आहेत. दरम्यान, नोव्हेंबरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही वाघनखं महाराष्ट्रात आणण्याचं नियोजन करण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi and hindi industry actors meet minister sudhir mungantiwar about bringing back chhatrapati shivaji maharaj waghnakha megha dhade shared photos sva 00
Show comments