मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटी म्हणजेच दादासाहेब फाळके चित्रनगरीतील एक धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. प्रसिद्ध कला दिग्दर्शकाने सर्व ओळखपत्र दाखवल्यानंतरही त्याठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षकाकडून त्यांची अडवणूक करण्यात आली. विशेष म्हणजे अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांना फोन लावल्यानंतरही त्यांना पुढे सोडण्यात आलं नाही. आता लोकप्रिय अभिनेता अंकुर वाढवे याने याबद्दल संताप व्यक्त केला आहे.

गोरेगावमधील दादासाहेब फाळके चित्रनगरीत अनेक चित्रपट आणि मालिकांचे शूटींग सुरु असतं. मात्र याच ठिकाणी ‘रावरंभा’, ‘झाला बोभाटा’, ‘हाफ तिकीट’, ‘टुरिंग टॉकीज’ यांसारख्या चित्रपटांचं कला दिग्दर्शन करणाऱ्या वासू पाटील यांचा अपमान झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वासू पाटील यांनी याबद्दल एक व्हिडीओ आणि पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
आणखी वाचा : “तुम्ही ब्राह्मण असूनही मांसाहार करता?” चाहतीच्या कमेंटवर सुकन्या मोने म्हणाल्या, “ते चांगलं की वाईट…”

Navra Maza Navsacha 2 loksatta latest news
पुन्हा एकदा मनोरंजनाचा प्रवास, ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटातील कलावंत ‘लोकसत्ता’ कार्यालयात
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
article about veteran film critic and author aruna vasudev
व्यक्तिवेध : अरुणा वासुदेव
Rajinikanth, Rajinikanth will star in coolie movie, Nagarjuna Akkineni, nagarjuna, Sathyaraj, Shruti Haasan, Coolie movie,
सुपरस्टार रजनीकांत, नागार्जुन अन् ‘बाहुबली’ फेम सत्यराज; ‘या’ चित्रपटात दाक्षिणात्य दिग्गजांची मांदियाळी, पोस्टर प्रदर्शित
Thief arrested for stealing from Marathi director Swapna Joshi house Mumbai news
मुंबई: मराठी दिग्दर्शिकेच्या घरी चोरी करणाऱ्याला अटक
shraddha kapoor new house set become akshay kumar neighbour in juhu on rent
कोट्यवधींची मालकीण असून श्रद्धा कपूर राहणार भाड्याने; जुहूमध्ये ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या शेजारी घेणार फ्लॅट
Minu Muneer
Minu Muneer : “तो खोलीत आला आणि बेडवर खेचून…”, मल्याळम सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचा सहकलाकारांवर गंभीर आरोप!
writer Winston Groom Forrest Gump An unknown novel after the hit movie
स्मरण-टिपण: गाजलेल्या सिनेमानंतरची अपरिचित कादंबरी…

वासू पाटील यांची पोस्ट

“धक्कादायक, काल काही कामानिमित्त मी मुंबईमधील दादासाहेब फाळके चित्रनगरी मध्ये चाललो होतो. नियमानुसार मला सुरक्षारक्षक यांनी मला विचारपूस करण्यासाठी अडवले. मी ही थांबलो, पण मी माझे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे ओळख पत्र दाखवले, तर उत्तर आले असले कार्ड चालत नाही. मी बोललो मी कला दिग्दर्शक आहे मला, ‘जगदंब क्रिएशन’ च्या सेटवर मिटिंगला जायचे आहे, तर बोलले की आम्ही नाही ओळखत. कॉल लावून द्या नाहीतर मेसेज दाखवा. मी निर्मात्यांचा मेसेज दाखवला तर बोलला की असले मेसेज फेक असतात.

मग मी डायरेक्ट डॉ. अमोल कोल्हे यांना संपर्क करून त्यांना बोलायला दिले तर मग पोपटासारखा बोलायला लागला आणि फोन बंद होताच पुन्हा मला नियमाने आत सोडायला येणार नाही, तुम्ही कोणालाही कॉल कराल, मी नाही ओळखत असं म्हणाला. मग मला बोलला ‘जावा पुढे कसे जाता बघतो ‘ त्या बहाद्दराने २ नं गेटवर कॉल करून गाडी अडवायला सांगितली. तिथेही थांबलो. जसे काही अतिरेकी पकडल्यागत सगळे अंगावर आले. मग मी त्यांना तुम्ही सगळ्यांना याच चौकशीतून सोडता का असा सवाल केला. मग त्यांची गडबड झाल. त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे मला घेऊन गेले. मला अस वाटलं की अरे मी बॉर्डर तर पार नाही केली ना, वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे गेल्यावर पुन्हा प्रोडक्शनला कॉल लावून दिला. मग सगळे सारवासारव करायला लागले, पण मी त्या अधिकाऱ्याला ठणकावून सांगितले की साहेब तुम्हाला बदलीचा पिरेड असतो. पण कला दिग्दर्शकामुळेच या चित्रनगरीला महत्व आहे. आम्ही कायमच येत असतो. तर यावर चांगला तोडगा काढला पाहिजे. सर्वांना एकसारखे नियम,, नाहीतर कडक अंमलबजावणी झालीच पाहिजे. यात माझा एक तास वेळ विनाकारण वाया गेला”, असे वासू पाटील यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा : “तिची मतं, कृती मला पटत नाही, पण…”, देवेंद्र फडणवीसांनी अमृता फडणवीसांबद्दल मांडलं स्पष्ट मत, म्हणाले “महिलांनी इतकी…”

आणखी वाचा : प्रत्येकीला वेगळा रंग, ब्लाऊजवर विशिष्ट संदेश अन्…; ‘बाईपण भारी देवा’मधील ‘मंगळागौर’ गाण्यासाठी वापरलेल्या साड्यांची ‘ही’ आहे खासियत

त्यांनी या घटनेचा व्हिडीओही शेअर केला आहे. तसेच याबद्दल संतापही व्यक्त केला आहे. अंकुर वाढवेने वासू यांची ही पोस्ट शेअर केली आहे. “हे सगळं भयानक आहे यावर कार्यवाही झाली पाहिजे”, असे त्यांनी म्हटले आहे.