मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार हे कायमच विविध कारणांनी चर्चेत असतात. गेली अनेक वर्ष मराठी सिनेसृष्टीशी जोडलेला प्रसिद्ध फोटोग्राफर स्वप्नील रास्ते हा सोशल मीडियावर सतत सक्रीय असतो. नुकतंच त्याने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे तो चर्चेत आला आहे.

स्वप्नील रास्ते हा गेल्या अनेक वर्षांपासून विविध मराठी कार्यक्रमांचे इव्हेंट मॅनेजमेंट, सूत्रसंचालन करत असतो. तसेच तो अनेक कार्यक्रमांचेही आयोजन करताना दिसतो. त्याचा अनेक कलाकारांबरोबर चांगला परिचय आहे. यामुळेच विविध राजकीय कार्यक्रमात सेलिब्रिटींना आमंत्रित करण्याचे काम तो करत असतो. पण आता त्याने काही सेलिब्रिटींची अवास्तव मागणीबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा : “लक्ष्मीकांत बेर्डेंचा शेवटचा चित्रपट आणि माझा…”, मेघा घाडगेने सांगितला विचित्र योगायोग, म्हणाली “आजही १९ वर्षानंतर…”

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
People who laughed at my work and made fun of me are today giving compliments and saluting Bela Gram Panchayat
‘टीका करणारे आता कौतुकाचा वर्षाव करीत आहेत’…राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त बेला गाव अन् महिला सरपंचाची अनोखी यशोगाथा
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर

स्वप्नील रास्तेची फेसबुक पोस्ट

“(कार्यक्रम पत्रिका छापून आल्यावर) मी सेलिब्रिटी आहे यार, माझ्या ह्या ह्या अटी आहेत, तरच मी येईन, नाहीतर कॅन्सल करू. बरं! मी ही क्लाएंट आहे तुझा. माझ्या अटींचं काय? बरं, ह्या अटी आधी का नाही नमूद केल्या? कलाकार मित्रांनो, प्रत्येकाचा काळ हा मर्यादितच असतो. रहा की जमिनीवर आणि करा की काम. अमर्यादित काळ मनात घर करून राहाल, एक माणूस म्हणून सुध्दा!”, अशी पोस्ट स्वप्नील रास्तेने केली आहे.

स्वप्नीलच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी सहमती दर्शवली आहे. तर काही चाहत्यांनी त्यावर कमेंट करत त्याला पाठिंबा दिला आहे. “उद्या हीच लोक भीक मागत येतील तुमच्याकडे सर सोडून द्या त्यांना अहंकारी लोक आहेत,मी अनेक लोकांना स्टेज दिलो सगळी व्यवस्था स्वखर्चाने केलो त्यावेळी लोक मला साधी ओळख देत न्हवते आज 1 हजारांची गरज आहे म्हणून फोन करतात, अशी हाल होईल त्यांचे काळजी करू नका,सोडून द्या”, अशी कमेंट एका व्यक्तीने केली आहे.

त्यावर स्वप्नीलने “थोडी हार्श भाषा होते आहे. अशी वेळ कोणाहीवर न येवो. मला १०० पैकी ९५ लोकांचं सहकार्यच लाभलेलं आहे. पण कधी कधी आधीही आपल्यासोबत काम केलेले कलाकार अचानक असं वागू लागले आणि ती वेळ ही न बघता, तर थोडं वाईट वाटतं बाकी काहीच नाही. अटी शर्ती ह्या जरूर ठेवाव्यात पण त्या वेळच्या वेळी सर्व ठरवायच्या आधी ठेवल्या गेल्या हव्यात. असो, विषय फार मोठा नाही. २ दिवसांपूर्वी होऊन गेलेला आहे व client च्या सांगण्यानुसार सदर सेलिब्रिटी व्यक्तीची replacement करून कार्यक्रम ही पार पडला आहे”, असे प्रतिक्रिया देत म्हटले आहे.

Story img Loader