Holi 2025: बुरा ना मानो होली है…असं म्हणत आज देशभरात धुळवड साजरी केली जात आहे. सर्वजण वेगवेगळ्या रंगात रंगून गेले आहेत. सर्वत्र आनंदात, उत्साहाने धुळवड साजरी केली जात आहे. कलाकार मंडळी देखील धुळवड साजरी करताना दिसत आहेत. मराठी कलाकार मंडळींनी आपल्या कुटुंबासह, मित्रपरिवारासह धुळवड साजरी केली. याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून कलाकारांनी चाहत्यांना धुळवडच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हिंदू धर्मातील एक प्रमुख सण धुळवड आहे. धुळवड सण रंग, प्रेम आणि वसंत ऋतुचे एक प्रतिक आहे. या दिवशी सर्वजण एकमेकांना रंग लावून धुळवड साजरी करतात. त्यामुळे कलाकार मंडळीही रंगात रंगून गेल्याचं पाहायला मिळत आहेत. अभिनेता रितेश देशमुख, जिनिलीया देशमुख, आदेश बांदेकर, प्रसाद खांडेकर, हेमांगी कवी, श्रुती मराठे, गौरव घाटणेकर, अपूर्वा नेमळेकर, स्वरदा ठिगळे, वीणा जगताप अशा मराठी सिने व मालिकाविश्वातील कलाकारांनी धुळवड साजरी केली. या कलाकारांनी सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत.

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत झळकलेली अभिनेत्री श्वेता मेहेंदळेने एक व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओमध्ये धुळवड निमित्ताने अभिनेत्रीने केलेला जेवणाचा खास बेत दाखवला आहे. पुरणपोळी, खानदेशी वांगण्याचं भरीत, कटाची आमटी आणि ज्वारीची भाकरी असा खास जेवणाचा बेत धुळवड निमित्ताने श्वेताकडे पाहायला मिळाला.

रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख
रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख
श्रुती मराठे आणि गौरव घाटणेकर
श्रुती मराठे आणि गौरव घाटणेकर
मीनाक्षी राठोड आणि कैलास वाघमारे
मीनाक्षी राठोड आणि कैलास वाघमारे
अपूर्वा नेमळेकर

दरम्यान, मराठी कलाकारांप्रमाणेच बॉलीवूड कलाकार मंडळींनीदेखील धुळवड साजरी केली. अभिनेता विकी कौशल, कतरिना कैफ, रवीना टंडन, तमन्ना भाटिया, कार्तिक आर्यन अशा बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी धुळवड साजरी केली. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.