आशिष पाटील हा मराठी चित्रपटसृष्टीतील यशस्वी कोरिओग्राफर म्हणून ओळखला जातो. ‘लावणी किंग’ अशी ओळख असलेल्या आशिष पाटीलने अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांसाठी नृत्य दिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे. परंतु त्याचा हा प्रवास सोपा नव्हता याबाबत त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अनेक खुलासे केले आहेत. ‘चंद्रमुखी’ चित्रपटातील ‘बाई गं’ या लावणीचे नृत्य दिग्दर्शन आशिषने केले असून यासाठी त्याचे अनेक मान्यवरांनी कौतुक केले आहे. चित्रीकरणावेळी प्रत्येक गाण्यासाठी कशी मेहनत घेतली यावरही त्याने या मुलाखतीत भाष्य केले आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नृत्य-दिग्दर्शक आशिष पाटीलने नुकतीच राजश्री मराठीच्या ‘त्याची गोष्ट’ या कार्यक्रमात मुलाखत दिली. यामध्ये त्याने अनेक व्यक्तिगत गोष्टींचा उलगडा करीत सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर हिने ‘चंद्रमुखी’ चित्रपटासाठी कशी मेहनत घेतली याचे अनेक किस्से सांगितले आहेत. या वेळी आशिष म्हणाला, “लॉकडाऊन सुरू असताना अमृताने मला लावणीच्या अदाकारी शिकव, असे सांगण्यासाठी फोन केला होता. परंतु, तेव्हा मला तिने ‘चंद्रमुखी’बाबत काही सांगितले नव्हते. आम्ही ऑनलाइन प्रत्येक जुन्या लावणीची तयारी केली. त्यानंतर अमृताने मला एकदा फोन करून ‘बाई गं’ हे गाणे पाठवले, तो ट्रॅक ऐकून माझ्या डोळ्यांत पाणी आले…मी लगेच अमृताला कॉल केला तेव्हा मला तिने सांगितले मी ‘चंद्रमुखी’ करते आहे. पण, मला चित्रपटाचे दिग्दर्शक, गाण्याचे कम्पोझर कोणीच ठाऊक नव्हते. त्यानंतर ‘बाई गं’ गाण्यावर मी व्हिडीओ करून अमृताला पाठवला.”
आशिष पुढे म्हणाला, “व्हिडीओ पाहिल्यावर प्रसाद ओक म्हणाला, कमाल आशिष!…त्यानंतर आम्ही भेटलो त्याने मला सांगितले ‘चंद्रमुखी’ काय आहे? ती कशी आहे? मग प्रसादने मला सांगितले, तू हे सगळे अमृताला शिकव. मी महिनाभर अमृताकडून याचा सराव करून घेतला. अमृताच्या घरी एक छोटा रिहर्सल हॉल आहे त्या ठिकाणी सगळे जण रिहर्सल पाहण्यासाठी आले होते. अमृताने या लावणीचे सादरीकरण केल्यावर सर्वांनी टाळ्या वाजवून कौतुक केले. तिच्याकडून प्रत्येक कलाकाराने एक गोष्ट शिकण्यासारखी आहे ती म्हणजे डेडिकेशन. ती प्रचंड मेहनती आणि डेडिकेटेड आहे. तिला ती काय करतेय हे माहिती असते. ‘बाई गं’ गाण्याच्या वेळीही अमृता आधीच म्हणाली होती की, आशिष हे गाणे स्लो आहे पण हे गाणे लोक कायम लक्षात ठेवतील.”
हेही वाचा : ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाचा हिरो कोण? चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देत अदा शर्मा म्हणाली…
“‘बाई गं’ पाहिल्यावर मला हिंदी चित्रपटसृष्टीमधून फोन आला होता. त्या व्यक्तीचे मी नाव घेणार नाही पण, संबंधित व्यक्ती मला म्हणाला, ‘मोहे रंग दो लाल’ आणि ‘काहे छेड’ या दोन गाण्यांना मराठीतील ‘बाई गं’ हे गाणे टक्कर देऊ शकते. तेव्हा मला माझ्या कामाची पोचपावती मिळाली. या गाण्यासाठी चार ‘अ’ एकत्र आले अजय-अतुल, आशिष पाटील, अमृता आणि आर्या आंबेकर. मी मेलो तरी या गाण्याचा क्षण कधीही विसारणार नाही,” असेही आशिषने या मुलाखतीदरम्यान सांगितले.