मराठी तसेच हिंदी डान्स रिअॅलिटी शोजमधून मराठमोळ्या आशिष पाटीलने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. स्वत:ला डान्सर म्हणून सिद्ध केल्यानंतर नृत्यदिग्दर्शन, परीक्षण अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्याने पार पाडल्या.
सोनाली कुलकर्णीपासून ते अमृता खानविलकरपर्यंत अनेक कलाकारांच्या गाण्यांसाठी त्याने नृत्यदिग्दर्शन केलंय. ‘चंद्रमुखी’ चित्रपटातील लोकप्रिय लावणी ‘बाई गं ‘ याचंही आशिषनेच नृत्यदिग्दर्शन केलंय. लावणी जगणाऱ्या आशिषला ‘लावणीकिंग’ म्हणूनही ओळखलं जातं. अथक प्रयत्नानंतर आशिषने त्याचा स्वत:चा ‘कलांगण’ नावाचा डान्स स्टुडिओ सुरू केलाय.
हेही वाचा… “तिने असे कपडे…”, पापाराझींवर भडकली श्रिया सरनची वृद्ध चाहती; व्हिडीओ व्हायरल
नुकतीच आशिषने सेलिब्रिटी कट्टाच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत आशिषने सांगितलं की, त्याला बॉलीवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्याबरोबर काम करायची संधी मिळाली. आशिष म्हणाला, “बाई गं रिलीज झाल्यानंतर मला संजय सरांचा कॉल आला होता. त्यांच्या असिस्टंटने त्यांना दाखवल होत माझं प्रोफाईलं. जर भन्साळीजी एखाद्याबरोबर काम करतात, तर त्याचा संपूर्ण अभ्यास करतात. त्यांनी जवळपास माझा सगळा अभ्यास केलेला, की मी काय काय आयुष्यात केलंय किंवा मी कसा नाचतो. त्यांनी मला बोलावलं आणि ते सहज मला म्हणाले की, तू माझं गाणं करशील का? माझा देव माझ्यासमोर बसलेला. कारण ते जे करतात, ते माझं स्वप्न होतं. माझे टीम मेंबर्स मला म्हणायचे की, आशिष एकदातरी तू भन्साळींबरोबर काम करायला हवं. तू भारतीय संस्कृती जपण्यासाठी जे करतोस, तसंच ते करतात.”
आशिष पुढे म्हणाला, “त्यांनी मला विचारलं, तू माझं एक गाणं करशील का? तेव्हा माझे अश्रू अनावर झाले होते. तू का रडतोयस असं त्यांनी विचारलं. तेव्हा मी म्हणालो, हे आनंदाश्रू आहेत, हे माझं स्वप्न होतं आणि ते मी पूर्ण करणार होतो; पण ते एवढ्या लवकर पूर्ण होईल असं मला कधी वाटलं नाही.”
हेही वाचा… ठरलं तर मग: अर्जुन आणि सायलीला साक्षीविरोधात सापडला ‘हा’ पुरावा; लवकरच चैतन्यसमोर येणार सत्य?
“ते माझ्याशी मराठीतच बोलायचे. ते मला पाटील बोलायचे आणि मला ते खूप आवडलेलं, या सगळ्याने मी खूप भारावून गेलो होतो. प्रत्येक गोष्टीत ते मला विचारायचे की हे कसं वाटतंय तुला, इथे येऊन बघ. त्यांच्याबरोबर काम करताना मी विसरून गेलो होतो की मी आधी काय शिकलोय. त्यांच्याबरोबर काम करत असताना मी काहीतरी नव्याने शिकतोय असं मला वाटायचं. असं म्हणतात की, प्रत्येक कलाकाराने त्यांच्याबरोबर एकदातरी काम केलंच पाहिजे, कारण तुम्ही जेव्हा त्यांच्याबरोबर एक काम करता तेव्हा तुम्ही पाच वर्षांचा अनुभव घेता असं मला वाटत”, असंही आशिषने नमूद केलं.
हेही वाचा… “तात्या विंचू पुन्हा येतोय!”, आदिनाथ कोठारेने शेअर केलं नव्या सिनेमाचं पोस्टर, अभिनेता म्हणाला…
ह
गाण्याबद्दल सांगताना आशिष म्हणाला, “मी एकच गाणं केलंय ते लवकरच रिलिज होणार आहे. १ मे ला नेटफ्लिक्सवर हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येईल. ‘बाई गं’ या गाण्याच्याच जॉनरचं ते गाणं आहे, यात सोलो परफॉर्मन्स आहे.
संजय लीला भन्साळींच्या ‘हिरामंडी’ या सीरिजसाठी आशिष पाटीलने नृत्यदिग्दर्शन केलंय. याबद्दल आशिषने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्टदेखील शेअर केली होती.