प्रसिद्ध नृत्यांगना आणि मराठी चित्रपट अभिनेत्री म्हणून मेघा घाडगेला ओळखले जाते. ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात ती सहभागी झाली होती, या कार्यक्रमामुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली. ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. ती विविध प्रकारचे फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकतीच मेघाने नवीन गाडी घेतली.
हेही वाचा – “आता फक्त आठवणीतच…”, शशांक केतकरचा वडिलोपार्जित वाडा पाडला जाणार; म्हणाला, “एका घराऐवजी…”
मेघाने तिच्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत नवीन गाडी घेतल्याची माहिती दिली. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी मेघाने स्वबळावर पहिली कार घेतल्याचं म्हटलं गेलं. यावर मेघाने कमेंट करत ही पहिली नसून पाचवी गाडी आहे व आपण कार लव्हर असल्याचं म्हटलं.
यावर एका युजरने कमेंट करत घेतल्या तर ‘आम्हाला थोडीच बसवणार त्यात, नुसता शो ऑफ’ अशी कमेंट केली. त्या कमेंटला मेघाने ‘जळकुंडे’ म्हणत हसणारे इमोजी टाकून उत्तर दिलं.
दरम्यान, मेघाने कार घेतल्यावर मराठी चित्रपटसृष्टीतील तिचे मित्रमैत्रिणी व चाहते कमेंट करून शुभेच्छा देत आहेत. मेघाने अनेकांना रिप्लाय देत त्यांचे आभार मानले आहेत.