लोकप्रिय लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर ( Digpal Lanjekar ) सध्या ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. ठिकठिकाणी दिग्पाल लांजेकर या चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी आळंदीमध्ये या चित्रपटातील पात्र परिचयाचा मोठा सोहळा पार पडला. संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत अभिनेता तेजस बर्वे, संत मुक्ताईची भूमिकेत अभिनेत्री नेहा नाईक, संत निवृत्तीनाथ यांच्या भूमिकेत अक्षय केळकर आणि संत सोपानकाकांच्या भूमिकेत अभिनेता सूरज पारसनीस झळकणार आहे. १८ एप्रिलला दिग्पाल यांचा ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अशातच दिग्पाल लांजेकरांनी चाहत्यांना सावध केलं आहे. नेमकं त्यांच्याबरोबर काय घडलं? जाणून घ्या…

दिग्पाल लांजेकरांनी चाहत्यांना सावध करण्यासाठी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून दिग्पाल लांजेकरांचं ( Digpal Lanjekar ) फेक अकाऊंट्स बनवले जातं असल्याचं समोर आलं आहे. या फेक अकाऊंट्समधून होणारा गैरप्रकार टाळण्यासाठी दिग्पाल लांजेकरांनी आधीच चाहत्यांना सावध केलं आहे. त्यांनी फेक अकाऊंटचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये दिग्पाल यांचा फोटो आणि ‘सुभेदार’ चित्रपटाचा प्रोफाइल फोटो पाहायला मिळत आहे.

दिग्पाल लांजेकर ( Digpal Lanjekar ) यांनी फेक अकाऊंटचा फोटो शेअर करत लिहिलं आहे, “सावधान राहा…आता माझा प्रोफाइल फोटो वापरून फेक अकाऊंट क्रिएट केली जात आहेत आणि त्या अकाऊंटवरून अनेक लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट जात आहेत…मेसेज करत आहेत त्याला रिप्लाय करू नका…कृपया या प्रोफाइल रिपोर्ट कराव्यात…सावधानता बाळगा आणि कुठलीही माहिती देऊ नका.”

दरम्यान, दिग्पाल लांजेकरांच्या ( Digpal Lanjekar ) कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्यांनी अभिनय, दिग्दर्शन, लेखन यामधून मराठी सिनेसृष्टीत एक वेगळी छाप उमटवली आहे. ‘श्री शिवराज अष्टक’ या त्यांच्या अनोख्या संकल्पनेच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. त्यामुळे त्यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’ यांचा वेगळा चाहता वर्ग तयार झाला आहे. दिग्पाल यांनी नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमात काम केलं आहे. आता दिग्पाल यांचा आगामी चित्रपट ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतोय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.