हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ हा चित्रपट शुक्रवारी २४ नोव्हेंबरला प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे अनेक चित्रपट समीक्षक आणि कलाकार कौतुक करताना दिसत आहे. सध्या हा चित्रपट चांगलाच चर्चेत असून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. अनेक ठिकाणी हा चित्रपट हाऊसफुल पाहायला मिळत आहे. यावरुन एका ट्रोलरच्या कमेंटवर हेमंत ढोमेने सडेतोड उत्तर दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘झिम्मा २’ या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, निर्मिती सावंत, सायली संजीव, शिवानी सुर्वे, रिंकू राजगुरू हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकत आहेत. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत ७.३८ कोटींची कमाई केली आहे.
आणखी वाचा : “कथा कशी मांडावी…”, ‘झिम्मा २’ पाहिल्यानंतर प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाला “मी लेखक नसल्याने…”

महाराष्ट्रातील अनेक चित्रपटगृहात झिम्मा २ हा चित्रपट हाऊसफुल्ल पाहायला मिळत आहे. त्या निमित्ताने अभिनेता हेमंत ढोमेने एक पोस्ट शेअर केली होती. यावर एका नेटकऱ्याने ट्रोलिंग करणारी कमेंट केली आहे.

“आमच्या इकडं तर एक काळ कुत्र जात नाहीय, कसं आणि कुठं चालू आहे हाऊसफुल्ल हे”, अशी कमेंट त्या नेटकऱ्याने केली आहे. यावर हेमंत ढोमेने सडेतोड उत्तर दिलं आहे. “कारण सिनेमा माणसांसाठी बनवलाय! त्यामुळे तुम्हाला तसं वाटत असेल”, असे हेमंत ढोमेने म्हटले आहे.

हेमंत ढोमे

आणखी वाचा : Jhimma 2 Review: जीवाभावाच्या मैत्रिणींच्या रियुनियनची भावुक करणारी गोष्ट; वाचा कसा आहे ‘झिम्मा २’

दरम्यान कलर यल्लो प्रॅाडक्शनच्या सहकार्याने जिओ स्टुडिओज, चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्माते आहेत. सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकु राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.