केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. ३० जूनला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला असून प्रेक्षक या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद देत आहेत. ‘बाईपण भारी देवा’ला प्रेक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे दिग्दर्शक केदार शिंदेंसह चित्रपटाच्या संपूर्ण टीमने सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.
हेही वाचा : रणवीर-आलियाच्या “रॉकी और रानी…”च्या ट्रेलरमध्ये दिसली ‘या’ स्टारकिडची झलक; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यावर चित्रपटाच्या टीमने ‘राजश्री मराठी’शी संवाद साधला. यावेळी दिग्दर्शक केदार शिंदेंनी त्यांचे वैयक्तिक आयुष्य आणि त्यांच्या आगामी मराठी चित्रपटांबाबत प्रेक्षकांना माहिती दिली. केदार शिंदे म्हणाले, “बाईपण भारी देवा चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून फार आनंद झाला आहे. मात्र, यापुढे अजून चांगले काम केले पाहिजे याचे दडपण आहे आणि भविष्यात असेच चांगले काम करण्याचे नवे चॅलेंज मी स्वीकारले आहे.”
हेही वाचा : अभिनेत्री सारा अली खान पोहोचली गोव्यात, ‘त्या’ व्यक्तीसह फोटो शेअर केल्यामुळे डेटिंगच्या चर्चांना उधाण
केदार शिंदे पुढे म्हणाले, “प्रत्येक वेळी एका रेषेच्या बाजूला आणखी मोठी रेष आखून, आता याच्या पुढे आपण जायचे आहे हे मनात कायम ठेवायचे. माझ्यासाठी यातील एक रेष ‘महाराष्ट्र शाहीर’ होती आता दुसरी रेष ‘बाईपण भारी देवा’ आहे. आता भविष्यात यापेक्षा अजून चांगले करण्याचे आव्हान माझ्यापुढे असणार आहे.”
“यंदाचे वर्ष हे २०२३ आहे. २०२३ मधील सगळ्या अंकांची बेरीज केली की, ७ आकडा येतो. त्याचप्रमाणे माझी जन्मतारीख १६ असल्याने त्याची बेरीज सुद्धा ७ येते. एकंदर आतापर्यंत “सात साथ है…” असे गणित जुळून आले आहे. आता भविष्यात आणखी चांगले चित्रपट करून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार”, असे केदार शिंदे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिका का लोकप्रिय ठरली? अमेय वाघ कारण सांगत म्हणाला, “आम्ही मित्र…”
दरम्यान, बाईपण भारी देवा’या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपा चौधरी या अभिनेत्रींनी मुख्य भूमिका साकारली आहे. तसेच याबरोबरच अभिनेते शरद पोंक्षे, पियुष रानडे यांच्याही या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहेत.