दिग्दर्शक केदार शिंदे यांचा ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नुकतंच केदार शिंदे यांनी अभिनेता अंकुश चौधरीची पत्नी आणि अभिनेत्री दीपा परब-चौधरी हिच्यासाठी एक खास पोस्ट केली आहे.

केदार शिंदे हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात. नुकतंच त्यांनी दीपा परबबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्याबरोबरच त्यांनी तिच्याबरोबरच्या आठवणीही शेअर केल्या आहेत. यावेळी त्यांनी दीपा आणि अंकुशची लव्हस्टोरीही सांगितली आहे.
आणखी वाचा : Video : “साडीच्या रंगाचा परकर मिळाला नाही का?” रील व्हिडीओमुळे मानसी नाईक ट्रोल

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
shraddha kapoor andrew garfield
बॉलीवूडची ‘स्त्री’ अन् ‘स्पायडरमॅन’ जेव्हा एकत्र येतात, श्रद्धा कपूर आणि अँड्र्यू गारफिल्डचे फोटो पाहून चाहते म्हणाले…
Marathi actress alka kubal praise to shivali parab for work on mangla movie
“बऱ्याच नायिका मी किती सुंदर…”, अलका कुबल यांनी ‘मंगला’ सिनेमासाठी केलं शिवाली परबचं कौतुक; म्हणाल्या…
Reshma Shinde Wedding Video writes special kannda msg
Video : पतीसाठी ‘कन्नड’मध्ये खास मेसेज, मंडपात थाटात एन्ट्री अन्…; रेश्मा शिंदेच्या लग्नात मित्रमंडळींच्या डोळ्यात आनंदाश्रू…

केदार शिंदेंची पोस्ट

“हा माझा आणि दीपा परब-चौधरीचा पहिला एकत्र फोटो. दिपाला मी college पासून ओळखतो. अंकुश भरत दिपा सगळे MD college मध्ये होते. पुढे माझ्या पहिल्या व्यावसायिक नाटकातून दिपाने पदार्पण केलं. अंकुशच्या प्रेमात तर ती तेव्हा college पासून अखंडपणे बुडाली होती. कालांतराने माझ्या मनोमनी या मोहन जोशी सोबत नाटकातही ती प्रमुख भूमिकेत होती. खुप एकत्र काम केलं. आणि… एकेदिवशी ती माझी वहिनी झालीच. अंकुश चौधरी या माझ्या मित्रांसोबत आज ती संसारात सुखासमाधानाने नांदते आहे.

१२ वर्षांच्या गॅपनंतर तिने माझ्या बाईपणभारीदेवा या चित्रपटातून पुर्नआगमन केलं आहे. झी मराठीची “तू चाल पुढं” ही मालिका या चित्रपटाच्या नंतरची. पण आधी ती प्रदर्शित झाली. आणि आज दिपा स्टार आहे. प्रमोशनसाठी गेल्यावर तीची क्रेझ दिसते. खुप आनंद वाटतो. पण जे तिने बाईपणभारीदेवा चित्रपटात काम केलं आहे ते पाहून ती किती प्रगल्भ कलावंत आहे, ते समजतं. तुम्ही या माझ्या वहिनीच्या कामावर प्रचंड प्रेम कराल याची खात्री आहे. आणि खुप धन्यवाद अंकिता या फोटोसाठी!!”, अशी पोस्ट केदार शिंदेंनी केली आहे.

आणखी वाचा : Video : विनोदी रसिकांसाठी खास पर्वणी, प्रशांत दामले, समीर चौघुले, विशाखा सुभेदार आणि दत्तू मोरे एकत्र झळकणार, ट्रेलर प्रदर्शित

दरम्यान केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपा चौधरी या अभिनेत्री मुख्य भूमिकेत असणार आहेत. तर याबरोबरच अभिनेते शरद पोंक्षे, पियुष रानडे यांच्याही या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहेत. ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचं कथानक महिलांभोवती फिरणारं असलं तरी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक पुरुषालाही हा चित्रपट बरंच काही सांगून जाणार आहे. हा चित्रपट ३० जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader