मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार मूळचे कोकणातील आहेत. अलीकडे हे कलाकार मुंबई गोवा महामार्ग, कोकणाचा विकास, रस्त्यांवरील खड्डे, ग्रामीण भागात मिळणाऱ्या सुखसुविधा यावर उघडपणे आपलं मत मांडताना दिसतात. मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचं गावही कोकणात आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी कोकणाच्या विकासाबाबत भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : मुग्धा वैशंपायनबरोबरच तिच्या बहिणीचंही ठरलं लग्न, फोटो शेअर करत मुग्धा म्हणाली, “माझं आणि ताईचं…”

‘करून गेलो गाव’ या मालवणी भाषेतील नाटकाचा शंभरावा प्रयोग १५ ऑक्टोबरला पार पडला. यानिमित्ताने महेश मांजरेकर यांनी ‘झी २४ तास’ या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय आणि सामाजिक स्थितीबाबत आपलं स्पष्ट मत मांडलं. गाव आता शहर होत चाललंय या प्रश्नावर महेश मांजरेकर म्हणाले, “मी मूळचा कोकणातला आहे त्यामुळे कोकणाबद्दल मला प्रचंड प्रेम आहे. आमच्या प्रदेशाला जे महत्त्व प्राप्त होणं गरजेचं आहे ते अजिबातच मिळालेलं नाही. आज लोक मालदिव, फुकेट, गोवा अशा अनेक ठिकाणी फिरायला जातात. पण, आपल्या कोकणाला सुद्धा अप्रतिम सुंदर असा समुद्रकिनारा लाभलेला आहे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे.”

हेही वाचा : निळाशार समुद्र, हातात चुडा अन्…; लग्नानंतर पहिल्यांदाच मालदिवला पोहोचली परिणीती चोप्रा; म्हणाली, “मी हनिमूनला…”

महेश मांजरेकर पुढे म्हणाले, “आज गोवा या राज्याची आर्थिक स्थिती केवळ पर्यटनामुळे एवढी पुढे गेली आहे. आपल्याला सुद्धा कोकणाच्या रुपात ही नैसर्गिक देणगी लाभलेली आहे. मला जगात सर्वात सुंदर कोकण वाटतं. हा एकमेव प्रदेश असा आहे जिथे तुम्हाला ५-५ मिनिटांच्या अंतरावर धबधबा, नद्या, डोंगर, समुद्रकिनारे दिसतात. अशा प्रदेशाकडे दुर्लक्ष झालं याची खंत वाटते. जर, कोकणाच्या विकासावर आणखी भर दिला, तर हे भारतातील सगळ्यात सुंदर पर्यटन स्थळ होईल.”

हेही वाचा : अभिनेत्री प्राजक्ता माळी नागपुरात या पदार्थांवर ताव मारणार, म्हणाली…

“कोकणाच्या रस्त्यावर प्रचंड खड्डे आहेत. मला असं वाटतं देशात जे मोठमोठे इंजिनिअर आहेत त्यांना ट्रेनिंग ग्राऊंड म्हणून कोकणाचा रस्ता असा ठेवलाय. जेणेकरून रस्ते कसे तयार करू नयेत हे त्या इंजिनिअरला कळेल. आधी आमचे रस्ते बरे होते…आताची परिस्थिती पाहून चौपदरीकरण नसतं झालं, तर बरं झालं असतं असं वाटू लागलंय. चौपदरीकरण सुरू झाल्यापासून अनेक ठिकाणी रस्ते आहेत की नाही अशी शंका येते. हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं आणि आता तरी रस्ता चांगला व्हावा अशी माझी मनापासून इच्छा आहे.” असं महेश मांजरेकर यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi director mahesh manjrekar talks about konkan region development sva 00
Show comments