मराठीमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शकांच्या यादीमधील एक महत्त्वाचे नाव म्हणजे नागराज मंजुळे. सामान्य लोकांनाही आपलासा वाटेल असे चित्रपट रुपेरी पडद्यावर घेऊन येणं ही नागराज मंजुळे यांची खासियत आहे. त्यांनी आतावर ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘नाळ’, ‘झुंड’ यांसारखे सुपरहिट चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले. सध्या नागराज मंजुळे हे भारताचे दिवंगत कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची घोषणा केली आहे. आता या चित्रपटात नवोदीत कलाकारांना काम करण्याची नामी संधी मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागराज मंजुळे यांच्या चित्रपटात काम करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. आता अनेक नवोदित कलाकारांना नागराज मंजुळेंच्या चित्रपटात काम करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. नागराज मंजुळे यांनी सोशल मीडियावर याबद्दल पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी नवोदित कलाकारांना ऑडिशन देण्याचं आवाहन केले आहे.
आणखी वाचा : Video : साईशा भोईरचा ‘नवा गडी नवा राज्य’ मालिकेला रामराम, ‘ही’ बालकलाकार झळकणार ‘चिंगी’च्या भूमिकेत, प्रोमो समोर

नागराज मंजुळेंनी नुकतंच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ‘खाशाबा’ चित्रपटाच्या ऑडिशनबद्दलची माहिती दिली आहे. त्यात त्यांनी वयोमर्यादा, अटी आणि ऑडिशन कशी द्यायची, याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

‘खाशाबा’ चित्रपटासाठी ऑडिशन कशी द्याल?

“जिओ स्टुडिओज आणि आटपाट निर्मित

खाशाबा
चित्रपट ऑडिशन
दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे

फक्त मुलांसाठी
वयोगट – ७ ते २५ वर्षे
मराठी भाषा तसंच माती आणि मॅटवरची कुस्ती येणं आवश्यक
पाच फोटो ( त्यातील 3 फोटो शरीरयष्टी दाखवणारे)
३० सेकंदाचा कुस्ती खेळताना व्हिडीओ.
३० सेकंदाचा स्वतःची थोडक्यात माहिती सांगणारा व्हिडीओ.
फॉर्म भरण्याची अंतिम मुदत २० जुलै”, अशी पोस्ट नागराज मंजुळेंनी केली आहे.

आणखी वाचा : “…तर मी दोन मुलांची आई असते”, केतकी चितळेच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली “वयाच्या चौथ्या वर्षी…”

नागराज मंजुळेनी काहीच दिवसांपूर्वी ‘खाशाबा’ चित्रपटाची मोठी घोषणा केली. भारताचे दिवंगत कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जीवनावर हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटाची निर्मिती नागराज मंजुळे करत आहेत. त्याबरोबर नागराज मंजुळे या चित्रपटाचे दिग्दर्शनही करणार आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi director nagraj manjule upcoming khashaba movie audition details inside nrp
Show comments