मराठी चित्रपट ‘हृदयात समथिंग समथिंग’ फेम दिग्दर्शक प्रवीण कारळे यांच्या निधनाची धक्कादायक बातमी समोर झाली आहे. आज (२३ जून रोजी) सकाळी दहा वाजता पुण्यात मंगेशकर रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रवीण यांच्या निधनाने मराठी चित्रपसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

८० लाख रुपयांच्या फसवणुकीबाबत रश्मिका मंदाना व तिच्या मॅनेजरने सोडलं मौन; म्हणाले, “आम्ही एकाच व्यवसायात…”

प्रवीण कारळे हे नाट्य आणि चित्रपट समीक्षक राजा कारळे यांचे पूत्र होते. वयाच्या चौथ्या वर्षी प्रवीण यांनी रंगभूमीवर पदार्पण केले होते. अगदी लहानपणापासूनच चित्रपटसृष्टीत कार्यरत असलेले प्रवीण कारळे यांचे ‘बोकड’, ‘भैरू पैलवान की जय’, ‘मानसन्मान’, ‘माझी आशिकी’, ‘हृदयात समथिंग समथिंग’ हे लोकप्रिय चित्रपट आहेत.

प्रवीण कारळे यांच्यावर आज संध्याकाळी वारजे इथं अंत्यसंस्कार केले जाणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे.