‘जीवलगा’ यासह अनेक मराठी मालिका व चित्रपटांचे दिग्दर्शक उमेश नामजोशी यांचे निधन झाले आहे. उमेश नामजोशी यांच्या निधनाने मराठी मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे. मराठी कलाकार व प्रेक्षक उमेश यांच्या जाण्याने भावुक झाले आहेत. ते आपल्या लाडक्या दिग्दर्शकाला श्रद्धांजली वाहत आहेत.

कलर्स मराठीने गुरुवारी (४ जानेवारी रोजी) इन्स्टाग्रामवर पोस्ट करून उमेश नामजोशी यांच्या निधनाची माहिती दिली आहे. त्यांच्या निधनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अभिनेता शशांक केतकरनेही इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत उमेश नामजोशी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ‘उमेश सर’ असं लिहून त्याने ही स्टोरी पोस्ट केली आहे.

Marathi Director Umesh Namjoshi Passed away
शशांक केतकरची पोस्ट

दरम्यान, उमेश नामजोशी यांनी स्टार प्रवाहवरील ‘जीवलगा’ आणि सोनी मराठीवरील ‘सावित्रीज्योती’ या मालिकांचे दिग्दर्शन केले होते. याशिवाय ‘जय जय स्वामी समर्थ’ ही कलर्स मराठीवरील मालिका त्यांनीच दिग्दर्शित केली होती. ‘गर्जा महाराष्ट्र’, ‘माझे मन तुझे झाले’, ‘टोपी घाला रे’, ‘कधी अचानक’, ‘भाकरखाडी ७ किमी’ या कलाकृतींचे ते दिग्दर्शक होते.

Story img Loader