कलाक्षेत्रामधील मंडळींचं खासगी आयुष्य जाणून घेण्याबाबत त्यांचे चाहते अधिक आतूर असतात. या मंडळींचं अफेअर असो वा साखरपुडा, लग्न याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगताना दिसते. मराठी चित्रपटसृष्टीमधील अशाच एक प्रसिद्ध व्यक्तीचा लग्नसोहळा नुकताच थाटामाटात पार पडला. ही व्यक्ती कोणी कलाकार नसून मराठमोळा दिग्दर्शक आहे. या दिग्दर्शकाच्या लग्नाला मराठीमधील अनेक कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. यादरम्यानचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वैभव चिंचाळकर असं या मराठमोळ्या दिग्दर्शकाचं नाव आहे. वैभवने सुबोध भावेची मुख्य भूमिका असलेल्या ‘पुष्पक’ विमान चित्रपटामधून दिग्दर्शक म्हणून नवा प्रवास सुरु केला. याआधी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. मराठीमधील या दिग्दर्शकाच्या आयुष्याला आता नव्याने सुरुवात झाली आहे.

मराठीमधील अनेक कलाकार मंडळींनी त्याच्या लग्नाला हजेरी लावली होती. यावेळी या कलाकारांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे त्याच्या लग्नसोहळ्या दरम्यानचे फोटो व व्हिडीओ शेअर करत त्याला मन भरून शुभेच्छा दिल्या. शिवाय सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये कलाकारमंडळींनी धमाल-मस्ती केल्याचं दिसून येत आहे.

आणखी वाचा – Video : एकीकडे मेकअप अन् दुसरीकडे मुलाला स्तनपान करत होती सोनम कपूर, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

या लग्नसोहळ्याला सुबोध भावे, मंजिरी भावे, सुयश टिळक, सायली संजीव, सुकन्या मोने, ऐश्वर्या नारकर यासारख्या सुप्रसिद्ध कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी नवविवाहित जोडप्याबरोबर फोटो, व्हिडीओ काढत त्यांना शुभेच्या दिल्या. सोशल मीडियाद्वारेही वैभव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi director vaibhav chinchalkar wedding marathi actors photos and videos goes viral on social media see details kmd