मराठी चित्रपट दिग्दर्शक विजू माने कायमच चर्चेत असतात. कविता असो किंवा चित्रपट अथवा वेबसिरीज विजू माने प्रेक्षकांना कायमच मनोरंजनाची मेजवानी देत असतात. काही महिन्यांपूर्वी त्यांचा ‘पांडू’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. समाजातील घडणाऱ्या घटनांवर ते कायमच भाष्य करत असतात. सोशल मीडियावर ते व्यक्त होत असतात. मागे पुरुषोत्तम एकांकिकेबाबत त्यांनी पोस्ट शेअर केली होती. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत एक भावुक पोस्ट शेअर केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकतीच त्यांनी एक पोस्ट आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये एका माणूस झोपलेला दाखवला आहे आणि त्या फोटोवर कॅप्शन दिला आहे की ‘स्वतः उठून नेतृत्व करण्याची माझी पात्रता नाही. त्यामुळे कुणाचं भाषण कस झालं हे सांगण्यापेक्षा… माझा झेपेल ते मी करतो…. असं लिहलं आहे. तर पोस्ट खाली कॅप्शन दिला आहे माझी झोप मला प्यारी **** गेली दुनियादारी. stop being political expert. better leave them upto politicinas’. अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Review : दिल्लीच्या तख्ताला मराठी मुलुखाचा स्वाभिमान समजायला लावणारा ‘शिवप्रताप गरुडझेप’

विजू माने यांची पोस्ट व्यंग्यात्मक जरी असली तरी त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे हे त्यांनी पोस्टमधून सांगितले आहे. सध्या चर्चा आहे ती दसऱ्याच्या निमित्ताने झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची, यावरून समाजमाध्यमात उलटसुलट चर्चा सुरु आहेत. मराठी कलाकार सध्या सुरु राजकारणावर भाष्य करताना दिसून येतात.

दरम्यान विजू माने पांडूनंतर स्ट्रगलर साला’ या वेबसीरीजवर काम करत आहेत. या वेबसीरीजला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. नुकतेच तिसरे पर्व सुरु झाले आहे. नेटकऱ्यांचे भरभरून प्रतिसाद या वेबसीरीजला येत आहेत. विजू माने यांना नुकताच झी कॉमेडी पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. ,

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi director viju mane commented on politics and common man spg