मराठी चित्रपट दिग्दर्शक विजू माने हे कायमच चर्चेत असतात. ते सोशल मीडियावर सक्रीय असतात. नुकतंच विजू माने यांनी केलेल्या एका पोस्टमुळे त्यांची पत्नी त्यांच्यावर रागवल्याचे दिसत आहे. तिच्या एका पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

विजू माने यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत एक जोडपे स्वंयपाकघरात काम करताना दिसत आहे. यावेळी ती महिला जेवण बनवत असताना भांड्याला आग लागते. ते पाहून तिचा नवरा घाबरतो आणि मुलीला घेऊन बाहेर पडतो. मात्र जाता जाता तो स्वयंपाकघराचा दरवाजा बंद करुन जातो.
आणखी वाचा : “तुम्हाला आशीर्वाद…” आशिष विद्यार्थी यांनी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधल्यानंतर पहिल्या पत्नीची पोस्ट, म्हणाली “खूप खंबीर…”

विजू मानेंनी हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी त्यांची पत्नीला “माझ्याकडून असं घडलं तर…” असा प्रश्न विचारला आहे. त्यावर अनघा यांनी “हिंमत तुझी” असे म्हटले आहे. “आजकाल निरागस चुका माफ करण्याची दानत उरली नाहीय”, असे कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिले आहे.

विजू मानेंच्या या पोस्टवर त्यांची पत्नी अनघाने कमेंट केली आहे. या घरी दाखवते चुका माफ कसं करतात ते, कुशल बद्रिके तू पण ये चहा प्यायला, अशी कमेंट केली आहे.

त्यावर कुशल बद्रिकेने “पण मी काय म्हणतो, विजू दादांना असे विचार येतातच कसे? म्हणजे येतात ती समस्या नाही, ते जाहीर बोलतात कसे?” अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यावर विजू मानेंनी “कुशा… का?” असा प्रश्न त्याला विचारला आहे.

आणखी वाचा : “कार दरीत कोसळल्यानंतर वैभवी उपाध्याय जीव वाचवण्यासाठी करत होती धडपड, पण…”; पोलिसांनी सांगितला सविस्तर घटनाक्रम

दरम्यान विजू माने आणि त्यांची पत्नी अनघा यांनी गंमतीत ही पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहेत.