आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणाऱ्या, आजही श्रोत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या लोकप्रिय गायिका आशा भोसले यांचा आज ९०वा वाढदिवस आहे. त्यांनी आतापर्यंतच्या कारर्किदीत ८०० हून अधिक चित्रपटांसाठी १० हजार गाणी रेकॉर्ड केली आहेत. आशाताईंचं आयुष्य हे संघर्षमयी आणि वादळी राहिलं आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने कलाकार मंडळी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आहेत. तसेच आशाताईंबद्दलच्या आठवणी सांगत आहे. अशाप्रकारे दिग्दर्शक विजू माने एक आशाताईंबद्दलची पोस्ट शेअर केली असून ती चांगलीच चर्चेत आली आहे.
विजू माने यांनी आशाताईंबरोबर एक जुना फोटो शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, “एकदा गप्पांच्या ओघात मी प्रा. प्रवीण दवणे सरांना विचारलं, “लता दीदी आणि आशाताई यातलं कोण ग्रेट असं तुम्हाला वाटतं?” त्यावर त्यांनी अत्यंत छान उत्तर दिलं होतं. आपल्याला पेपरात प्रश्न येतात. ज्यात पहिला प्रश्न कंपल्सरी असतो. पुढच्या दोन ते आठ पैकी कुठलेही पाच प्रश्न सोडवा असं लिहिलेलं असतं. लतादीदी पहिला प्रश्न, दोन ते आठ पैकी कुठलेही पाच प्रश्न सोडवतात आणि पैकीच्या पैकी मार्क मिळून जातात. आशाताई….पहिला प्रश्न सोडवतात. दोन ते आठ पैकी सगळे प्रश्न सोडवतात आणि पैकीच्या पैकी मार्क मिळवून जातात. त्यामुळे पैकीच्या पैकी मार्क मिळालेल्यांची आणखी काय तुलना करणार.”
हेही वाचा – गिरीजा ओकचा मुलगा शाहरुख खानला भेटला अन्…; अभिनेत्रीने सांगितलं काय होती लेकाची प्रतिक्रिया
पुढे विजू माने यांनी लिहीलं आहे की, “आज आशाताईंच्या वाढदिवसानिमित्त हा फोटो समोर आला. माझ्या आयुष्यात जे काही भाग्याचे क्षण आले त्यापैकी एक ‘हा’ होता. आशाताईंच्या कारकिर्दीबद्दल मानवंदना देणारा कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीत मला करता आला त्याबद्दल स्मिताताई तळवलकर यांचे मी आजही आभार मानतो. दिलखुलास, सदैव हिरव्या मनाने वावरणाऱ्या आशाताई आपण शतायुषी व्हा याच शुभेच्छा.”
हेही वाचा – ‘वीडी 18’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान वरुण धवनला दुखापत; व्हिडीओ शेअर करत म्हणाला…
हेही वाचा – ‘जवान’च्या शूटिंगदरम्यान शाहरुख खानने मागितली होती सहकलाकारांची माफी; किस्सा सांगत गिरीजा ओक म्हणाली…
दरम्यान, विजू मानेंच्या कामबद्दल बोलायचं झालं तर, त्यांनी अलीडेच ‘स्ट्रगलर साला सीझन तीन’चा सहावा एपिसोड प्रदर्शित झाला. आतार्यंत या एपिसोडला ६ लाख ५३ हजारपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यामध्ये विजू माने यांच्याबरोबर कुशल बद्रिके, अभिजीत चव्हाण पाहायला मिळत आहेत.