अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, निर्माता या भूमिका उत्तमरित्या निभावणारे लोकप्रिय कलाकार म्हणजे प्रवीण तरडे. या कलाकारानं मालिका, नाटक, चित्रपट या तिन्ही क्षेत्रात आपलं वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. तसेच त्यांनी मराठीसह हिंदीतही काम केलं. सलमान खानच्या ‘राधे’ या चित्रपटात प्रवीण तरडे झळकले होते. आता प्रवीण तरडे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत.

हेही वाचा – Video: ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील मीनाक्षी वहिनी झळकणार नव्या भूमिकेत

tarak mehta ka ooltah chashmah fame mandar chandwadkar dance with wife watch video
Video: ‘तारक मेहता…’ मधील भिडे मास्तर पोहोचले पेरुच्या शेतात अन् बायकोबरोबर केला मकरंद अनासपुरेंच्या गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
sushant singh rajput prateik babbar
सुशांत सिंह राजपूतने प्रतीक बब्बरला सांगितलेली ‘ही’ इच्छा राहिली अपूर्ण, खुलासा करत म्हणाला…
Jui Gadkari
Video : शूटिंगमध्ये फावला वेळ मिळताच जुई गडकरी काय करते? स्वत: व्हिडीओ पोस्ट करत दिली माहिती
Maharashtrachi Hasyajatra fame prithvik pratap reaction on prajakta mali phullwanti movie
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर ‘फुलवंती’ चित्रपटाची चर्चा, प्राजक्ता माळीने शेअर केला व्हिडीओ; पृथ्वीक प्रताप म्हणाला, “मला फुलवंती पेक्षा जास्त…”
vicky kaushal in parshuram role
‘छावा’नंतर भगवान परशुरामाची भूमिका साकारणार विकी कौशल; सिनेमाचे पहिले पोस्टर आणि जबरदस्त लूक आला समोर
marathi actress wedding photo
‘पुन्हा सही रे सही’ नाटकातील अभिनेत्रीचं थाटामाटात पार पडलं लग्न! यापूर्वी लोकप्रिय मालिकेत साकारलेली भूमिका, पाहा फोटो

अलीकडेच ‘बोल भिडू’ या यूट्युब चॅनेलवरील ‘दिलखुलास गप्पा’ कार्यक्रमात उपेंद्र लिमये आणि प्रवीण तरडे सहभागी झाले होते. त्यावेळेस प्रवीण तरडे यांनी दाक्षिणात्य चित्रपटात केलेल्या भूमिकेविषयी सांगितले. ते म्हणाले की, “या प्रोजेक्टबाबत आधीच काही सांगू शकत नाही. त्याची प्रेस स्वतः राजामौली सर घेणार आहेत. राजामौली सर स्वतः ते या प्रोजेक्टचे प्रेझेंटर आहेत. तसेच राजामौली सरांबरोबर मागील २०-२२ वर्ष जो दिग्दर्शक म्हणून त्यांच्याबरोबर काम करतोय. दोघांची एकत्र स्ट्रगल केलं. असं असताना की, मी दिग्दर्शक आहे आणि तू माझा सहाय्यक दिग्दर्शक आहे. असं ते दोघं एकत्र काम करत आलेत. आता राजामौली यांना सगळेच ओळखतात. त्यांना वाटलं आता आपण ज्याच्याबरोबर सगळं काही करतोय त्याची जगात एक ओळख निर्माण झाली पाहिजे. म्हणून राजामौलीबरोबर काम करणारी ती व्यक्ती आता पदार्पण करणार आहे. मी त्या चित्रपटात मुख्य खलनायकाची भूमिका करतोय. दाक्षिणात्य चित्रपटात खलनायक हा जास्त प्रसिद्ध असतो. त्यामुळे मी या चित्रपटाला आनंदाने होकार दिला. लवकरच त्याची प्रेस होईल आणि घोषणा सुद्धा होईल.”

हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ मालिकेतून आणखी एक एक्झिट; ‘या’ ज्येष्ठ कलाकाराच्या जागी दिसणार ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेता

हेही वाचा – “तुला स्टेजवर येऊन मारीन” असं उपेंद्र लिमये प्रवीण तरडेंना का म्हणाले होते? वाचा…

दरम्यान, प्रवीण तरडे यांच्यापूर्वी अनेक मराठी कलाकारांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम केलं आहे. सचिन खेडकर, सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, महेश मांजरेकर अशा बऱ्याच कलाकारांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयानं छाप पाडली आहे.