मराठी मनोरंजनविश्वातील असंख्य कलाकार वैयक्तिक किंवा व्यावसायिक कामानिमित्त मुंबई-पुणे महामार्गावरून प्रवास करतात. महामार्गावरून प्रवास करताना जर वाटेत लोणावळ्याला थांबलं, तर जास्तीचा टोल आकारला जातो असा अनुभव सामान्य माणसांप्रमाणे या कलाकारांनाही आला. या विरोधात अभिनेत्री ऋजुता देशमुख, अभिनेते-कवी किशोर कदम यांनी यापूर्वी संतप्त पोस्ट शेअर केल्या आहेत. आता प्रसिद्ध युट्यूबर आणि अभिनेता सारंग साठ्येने सुद्धा याविरोधात ट्वीट करत दुप्पट टोलसंदर्भात प्रश्न उपस्थित केला आहे.
१ एप्रिल २०२३ पासून मुंबई-पुणे महामार्गावरील टोलमध्ये बदल करण्यात आला होता. मुंबई ते पुणे या दोन शहरांमध्ये प्रवास करताना महामार्गामधून बाहेर पडल्यामुळे (लोणावळ्याला किंवा अन्य ठिकाणी थांबल्यास) मर्यादित अंतरासाठी २४० रुपये आकारले जातात. ऋजुता देशमुख लोणावळ्यात विश्रांतीसाठी थांबव्याने तिच्याकडून दुप्पट टोल वसूल करण्यात आल्याचे अभिनेत्रीच्या निदर्शनात आले. यानंतर किशोर कदम यांनाही सारखाच अनुभव आला.
हेही वाचा : Video: ‘माझा कारभार सोपा नसतोय रं’! गौतमी पाटीलच्या नवीन गाण्यात तिच्या नखरेल अदा पाहून प्रेक्षक म्हणतात…
आता सारंग साठ्येने टोलसंदर्भात ट्वीट केले आहे. हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार सारंग म्हणाला, “हे लोणावळ्यात नेहमीच घडतं. महामार्गावरून प्रवास करताना पैशांचा परतावा मिळविण्यासाठी आम्हाला सुमारे १५ मिनिटे थांबावे लागले. या कोणत्यातरी प्रभावशाली व्यक्तीचा टोल नाका असावा. राज्य सरकारने याबाबत जागरुक असणे आवश्यक आहे.
हेही वाचा : प्रेक्षकांवर ‘ड्रीम गर्ल २’ ची जादू कायम, सातव्या दिवशी केली दमदार कमाई; एकूण कलेक्शन ‘इतके’ कोटी
“बर्याच लोकांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे, परंतु काहीही बदलले नाही. अनेकदा टोल प्लाझाचे अधिकारे फास्ट टॅग नसल्याचं सांगतात आणि अनेकजण घाईने रोखीने पैसे भरतात. त्यानंतर पुढे त्यांना दोन-तीन तासांनंतर मेसेज येतो की फास्टटॅगद्वारे देखील रक्कम कापली गेली आहे. माझ्याबरोबरही हे घडले आहे.” असं सारंगने सांगितलं. दरम्यान, या कलाकारांनी त्यांच्या पोस्टमध्ये राज्य सरकार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टॅग केलेलं आहे.