बऱ्याचदा सिनेसृष्टीतील कलाकार राजकीय भूमिका घेताना कचरतात. काही कलाकार स्पष्टपणे त्यांची मतं बाजू, राजकीय विचार मांडतात तर काही कलाकार हे हातचं राखून बोलतात. शरद पोंक्षे, सुबोध भावे, किरण माने अशा मराठी मनोरंजनविश्वातील कित्येक कलाकार उघडपणे त्यांचे राजकीय विचार मांडतात. यांच्यापैकीच एक नामवंत दिग्दर्शक म्हणजे महेश टिळेकर.
महेश टिळेकर दिग्दर्शित ‘हवाहवाई’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी चित्रपटाला चांगलं प्रतिसाद दिला. उद्योग, व्यवसाय आणि घर सांभाळणाऱ्या कित्येक महिलांच्या संहर्षावर हा चित्रपट बेतला आहे. याच निमित्ताने या चित्रपटाच्या टीमने लोकसत्ता ऑनलाईनच्या डिजीटल अड्डावर हजेरी लावली आणि मनमोकळा संवाद साधला.
आणखी वाचा : “बाळासाहेब आणि शिवसेनेमुळेच आज मी…” अमिताभ बच्चन यांनी सांगितला ‘तो’ हृदयद्रावक किस्सा
याच मुलाखतीमध्ये महेश टिळेकर यांना राजकीय भूमिका घेण्याबद्दळ प्रश्न विचारण्यात आला. महेश टिळेकर हे सोशल मीडियाच्या मध्यमातून राजकीय विचार मांडत असतात, तसेच त्यांची बाजूदेखील ते स्पष्ट करतात. मध्यंतरी एका लोकप्रिय नेत्याच्या पत्नीच्या आवजाबद्दल त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं होतं तेव्हा त्यांच्यावर सडकून टीका झाली होती. याच बाबतीत बोलताना महेश टिळेकर म्हणाले, “इतर कलाकारांनी व्यक्त व्हावं याबाबत मी सांगू शकत नाही, पण माझ्यापुरती मी भूमिका घेतो, नंतर मला असं नको वाटायला की यावर बोललो असतो तर बरं झालं असतं. त्यामुळे आपल्याला जे पटतं किंवा खटकतं त्यावर व्यक्त व्हायला हवं.”
लोकसत्ता ऑनलाइनच्या डिजीटल अड्डावर ‘हवाहवाई’ या चित्रपटाचे निर्माते, तसेच अभिनेत्री वर्षा उसगांवकर आणि हास्यजत्रेतून घराघरात पोहोचलेले समीर चौघुले यांनीही हजेरी लावली आणि या मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्या पात्राविषयी आणि चित्रपटाविषयी दिलखुलास गप्पा मारल्या.