मराठी चित्रपट ‘एकदा येऊन तर बघा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना विनोदाचा तडका पाहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित झालं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- “हा भेदभाव…” दिग्दर्शक नागराज मंजुळेंनी केलेलं ‘सैराट’बद्दलचं वक्तव्य चर्चेत

‘ एकदा येऊन तर बघा’ चित्रपटातील नवीन गाणं नुकतचं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘अय्यो’ असं या गाण्याचे बोल आहेत. तेजस्वीनी पंडितने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या गाण्याची झलक शेअर केली आहे. तेजस्विनीने पोस्ट शेअर करत लिहिलं मुहूर्त ठरला, मंडप सजला..लग्न लागलं आणि आमचं नवं गाणं पण आलं ‘अय्यो..’तुम्ही सगळे येताय ना आमच्या वरातीत नाचायला #एकदायेऊनतरबघा फक्त चित्रपटगृहांत!

एकदा येऊन तर बघा’ चित्रपटात प्रेक्षकांना काय बघायला मिळणार?

चित्रपटात फुलंब्रीकर कुटुंबाची कथा दाखवण्यात आली आहे. फुलंब्रीकर कुटुंब हॉटेल व्यवसाय सुरू करतात पण हॉटेलमध्ये ग्राहक यावे यासाठी त्यांना खूप प्रयत्न करावे लागतात. पण जेव्हा ग्राहक हॉटेलमध्ये येतात तेच ग्राहक एकामागोमाग प्रॉब्लेम मध्ये अडकत जातात. त्यातून त्यांच्यावर कोणकोणते प्रसंग ओढवतात आणि त्याला ही मंडळी कशी सामोरी जातात? याची गंमतीशीर गोष्ट दाखवण्यात आली आहे.

हेही वाचा- बॉक्स ऑफिसवर भाईजानच्या ‘टायगर ३’ला टक्कर देणार दोन बहुचर्चित मराठी चित्रपट; कोणता चित्रपट मारणार बाजी?

एकदा येऊन तर बघा चित्रपट येत्या २४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सयाजी शिंदे, गिरीश कुलकर्णी, तेजस्विनी पंडित, भाऊ कदम, ओंकार भोजने, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, विशाखा सुभेदार, पॅडी कांबळे, राजेंद्र शिसटकर, वनिता खरात, रोहित माने, शशिकांत केरकर, सुशील इनामदार, जय चौबे, राकेश शालिन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi film ekda yeun tar bagha song aiyo out now dpj