गेल्या काही काळापासून महिला केंद्रित चित्रपटाच्या संख्येत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. मग तो केदार शिंदे यांचा गाजलेला ‘बाईपण भारी देवा’ असो किंवा हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’. या चित्रपटांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. महिलांचे आयुष्य, त्यांच्या जगण्याशी जोडलेल्या छोट्या मोठ्या गोष्टी, सामान्य स्त्रियांना आपली वाटणारी गोष्ट यांमुळे अशा चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. विशेषत: महिला प्रेक्षकांनी चित्रपटगृहात गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. आता या चित्रपटांच्या यशानंतर मृणाल कुलकर्णी, आश्विनी भावे आणि श्रुती मराठे या तीन दिग्गज आणि प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्री अशाच एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘गुलाबी’ असे या सिनेमाचे नाव आहे.

चित्रपटाने रचला इतिहास!

‘गुलाबी’ या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून मोठी चर्चा असल्याचे पाहायला मिळत आहे. मृणाल कुलकर्णी, आश्विनी भावे आणि श्रुती मराठे या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसत आहेत. तीन स्त्रियांची गोष्ट यामध्ये पाहायला मिळणार आहे. मात्र, प्रदर्शित होण्याआधीच चित्रपटाने इतिहास रचला आहे. तो नेमका काय, हे जाणून घेऊयात.

Emergency Box office collection day 19 Kangana Ranaut movie earned only 0.05 crore on Tuesday
कंगना रणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ने १९व्या दिवशी केली ‘इतकी’ कमाई, अजूनपर्यंत बजेटचा आकडा ओलांडू शकला नाही चित्रपट
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Film Acting Demar and Devar Hindi Cinema
चित्रपट: देमार आणि देव्हारपटांची पन्नाशी…
Aditya Sarpotdar
मराठी चित्रपटांनी कमाईचे आकडे दाखवणे किती गरजेचे? ‘मुंज्या’चा मराठमोळा दिग्दर्शक म्हणाला, “वाईट सिनेमांचे…”
Junaid khan says he releasing film on youtube is best
थिएटर व OTT च्या वादावर आमिर खानचा मुलगा म्हणाला, “चित्रपट युट्यूबवर मोफत…”
Deva Advance Booking Day 1
शाहिद कपूरच्या ‘देवा’ चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग सुरू; पहिल्याच दिवशी केली ‘इतकी’ कमाई
vaastav 2 sanjay dutt mahesh manjrekar
महेश मांजरेकरांच्या ‘वास्तव’चा २६ वर्षांनी येणार सिक्वेल? संजय दत्त सिनेमात दिसणार की नाही? वाचा…
trailer launch ceremony of first marathi film Ek Radha Ek Meera shot in Slovenia held in mumbai on friday
मराठी चित्रपटसृष्टीत मोठ्या स्तरावर चित्रपटांची निर्मिती होणे आवश्यक, महेश मांजरेकर

प्लॅनेट मराठी, व्हायलेट मोशन पिक्चर्स आणि साई पियुष म्युझिक या तीन इन्स्टाग्राम चॅनेलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये प्रदर्शित होण्याआधीच चित्रपटाने एक कोटी रुपयांची कमाई केल्याचे म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे, प्रदर्शित होण्याआधी इतकी कमाई करणारा ‘गुलाबी’ हा पहिला मराठी सिनेमा ठरला असल्याचे या पोस्टमध्ये म्हटले आहे.

इन्स्टाग्राम

सुरुवातीला ‘गुलाबी’ चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला. यामध्ये राजस्थानमधील दृश्य पाहायला मिळत आहे. यामध्ये आश्विनी भावे, श्रुती मराठे आणि मृणाल कुलकर्णी एकमेकींच्या मैत्रिणी असल्याचे दिसत आहे. एकीकडे त्या मजा मस्ती करताना दिसतात, तर दुसरीकडे प्रत्येकीच्या खासगी आयुष्यात काही ना काही चालू असल्याचे पाहायला मिळते. तर त्यानंतर ‘गुलाबी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. ट्रेलरच्या सुरुवातीलाच श्रुती आणि मृणाल यांच्या पात्रांमध्ये वाद झालेला पाहायला मिळतो. मृणाल रस्त्यावर वाट बघत उभी असते, श्रुती तिथून गाडीवरून जाते, त्यावेळी मृणालच्या अंगावर खड्ड्यातील पाणी उडते आणि त्यांच्यात वाद होतो. राजस्थानमध्ये पुन्हा त्यांची मैत्री झालेली दिसते. आता ही मैत्री कशी होणार, चित्रपटात नक्की कोणती गोष्ट दिसणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा: “एका काकूंनी त्यांच्या मुलीची ओळख करून दिली अन्…”; ‘आई कुठे काय करते’ फेम अभिषेक देशमुखने सांगितला किस्सा, म्हणाला, “हा यश…”

‘गुलाबी’ हा चित्रपट २२ नोव्हेंबर २०२४ ला प्रदर्शित होणार आहे. आता प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांना हा सिनेमा आवडणार का आणि चित्रपट किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader