मराठी सिनेसृष्टीत फिल्मफेअर पुरस्काराची कायमच चर्चा असते. नुकतंच फिल्मफेअर पुरस्काराचा रंगतदार सोहळा पार पडला. या सोहळ्याला अनेक मराठी कलाकारांनी ग्लॅमरस लूकमध्ये हजेरी लावली. या पुरस्कारांची घोषणा झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यंदाच्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये आपलं स्थान मिळवणारा ‘गोदावरी’ चित्रपटाचा डंका पाहायला मिळाला. जितेंद्र जोशी निर्मित ‘गोदावरी’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. त्याबरोबर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक निखिल महाजन, सर्वोत्कृष्ट पटकथा निखिल महाजन, प्राजक्त देशमुख, सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत ए. व्ही. प्रफुल्लचंद्र आणि जितेंद्र जोशीला बेस्ट क्रिटिक्स अभिनेता म्हणून पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे ‘गोदावरी ‘चित्रपटाने फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात बाजी मारल्याचे पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : महेश मांजरेकरांची लेक गौरी इंगावलेला मिळाला फिल्मफेअर पुरस्कार, सत्या मांजरेकर म्हणाला “तुझे खूप…”

गुरुवारी ३० मार्चला अनेक कलाकार आणि तंत्रज्ञांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पदार्पण स्त्री या विभागात अभिनेत्री ऋता दुर्गुळेला ‘अनन्या’ चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला आहे.

तसेच ‘मी वसंतराव’ या चित्रपटासाठी अनिता दातेला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री आणि राहुल देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून पुरस्कार मिळाला. त्याबरोबर ‘चंद्रमुखी’ चित्रपटासाठी आर्या आंबेकर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक स्त्री, अजय – अतुलला सर्वोत्कृष्ट संगीत, चंद्रा गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक दीपाली विचारे यांना पुरस्कार मिळाला आहे.

आणखी वाचा : “मी त्यावेळी दारोदारी फिरत होतो पण…” जितेंद्र जोशीने सांगितला महेश मांजरेकरांचा ‘तो’ किस्सा

त्याबरोबरच ‘बालभारती’ चित्रपटासाठी आर्यन मेघनजी याला सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून पुरस्कार मिळाला आहे. ‘वेड’ चित्रपटातील खुशी हजारेला सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi filmfare awards godavari movie get best film award nrp