सध्या बॉक्स ऑफिसवर ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. केदार शिंदे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. शुक्रवारी ३० जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आता या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात किती कमाई केली? त्याचा आकडा समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची कथा, संवाद, या चित्रपटाचं दिग्दर्शन, गाणी या सगळ्यालाच प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देताना दिसत आहेत. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाला IMDB या साईटवर ८.८ रेटींग आहेत.
आणखी वाचा : “इंग्रज कोकणस्थ ब्राह्मणांना आपली औलाद म्हणून सोडून गेले”, म्हणणाऱ्याला मराठी अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, “ही भाषा…”

या चित्रपटाचे सर्व शो सर्वत्र हाऊसफुल सुरू आहेत. हा चित्रपट चित्रपटगृहात दणदणीत कमाई करताना दिसत आहे. केदार शिंदे यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी या आठवड्याच्या अखेरीस चित्रपटाने किती कमाई केली, याबद्दल सांगितले आहे.

या चित्रपटाने पहिल्या दिवशी एक ते दीड कोटींची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २.१० कोटी आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने २.८० कोटींचा गल्ला जमवला होता. या चित्रपटाने पहिल्या वीकएण्डला ६.४५ कोटींचा गल्ला जमवला होता. त्यामुळे पहिल्याच आठवड्याअखेरीस सर्वाधिक कमाई करणारा या वर्षातला सुपरहिट मराठी चित्रपट ठरला होता.

आणखी वाचा : ‘बाईपण भारी देवा’ने मोडला बॉक्स ऑफिस रेकॉर्ड, कमाई पाहून केदार शिंदे म्हणाले, “तब्बल २१ वर्ष…”

यानंतर आता चार दिवसात या चित्रपटाच्या कमाईत घसघशीत वाढ झाली आहे. या चित्रपटाने पहिल्याच आठवड्याच्या अखेरीस १२.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे येत्या काही दिवसात हा चित्रपट १५ कोटींचा टप्पा पार करेल, असंही बोललं जात आहे. तसेच दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सोशल मीडियावरूनही प्रेक्षक या चित्रपटाचं भरभरून कौतुक करत इतरांना हा चित्रपट आवर्जून पाहण्याचं आवाहन करत आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi movie baipan bhari deva box office collection first week hit kedar shinde directed nrp