केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत. अवघ्या पाच कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. हा यंदाचा सर्वाधिक चाललेला चित्रपट ठरला आहे.
या चित्रपटाने पहिल्याच आठवड्याच्या अखेरीस १२.५० कोटी रुपयांची कमाई केली होती. तर दुसऱ्या आठवड्यातील रविवारी तब्बल ६.६० कोटींची विक्रमी कमाई केली. चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात २४.८५ कोटींचा गल्ला जमवला होता. ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एका दिवसात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.
प्रसिद्ध अभिनेत्याचा लोणावळ्याला जाताना अपघात, ट्रकने कारला दिली धडक; म्हणाला, “मी रात्रभर…”
‘बाईपण भारी देवा’ ३० जून रोजी प्रदर्शित झाला. चित्रपट मागच्या १८ दिवसांपासून थिएटर्समध्ये तुफान चालतोय. आता या चित्रपटाने ५० कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटाची एकूण कमाई ५० कोटींपेक्षा अधिक झाल्याचा अहवाल ‘सॅकनिल्क’ने दिला आहे. रविवारी १६ जुलै रोजी चित्रपटाने ५ कोटींची कमाई केल्याचं वृत्त त्यांनी दिलंय. आता एकूण कमाई ५४.७७ कोटी रुपये झाली आहे.
चित्रपटाची कमाई पाहता त्याची घोडदौड अशीच कायम राहील, असं दिसतंय. तीन आठवड्यानंतरही चित्रपटाला प्रेक्षक उत्स्फुर्त प्रतिसाद देत आहेत. दरम्यान, या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब या मुख्य भूमिकेत आहेत.