मराठमोळा अभिनेता प्रसाद ओक मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. मनोरंजन विश्वात अभिनय व कौशल्याच्या जोरावर त्याने स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. प्रसादने नाटकापासून अभिनयातील करिअरला सुरुवात केली होती. अभिनयाबरोबर प्रसाद चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शनही करतो. नुकतच प्रसादने नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- “तुमचे डोळे खूप थकलेले दिसत आहेत,” चाहत्याच्या प्रश्नावर मुक्ता बर्वेचं स्पष्ट उत्तर, स्वतःच्या तब्येतीची माहिती देत म्हणाली…

प्रसाद ओकने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने जिलेबी चित्रपटाच्या चित्रीकऱणाला सुरुवात झाली असल्याची माहिती दिली आहे. या चित्रपटात स्वप्नील जोशी – शिवानी सुर्वे यांची मुख्य भूमिका असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटाची निर्मिती आनंद पंडीत करणार आहे तर नितीन कांबळे या या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. शेअर केलेल्या फोटोत प्रसाद ओक बरोबर श्रीनिवास सुर्वे आणि स्वप्नील जोशी दिसत आहेत. प्रसादने फोटो शेअर करत लिहिलं आहे “नवा चित्रपट…!!! “जिलबी” चित्रीकरण आजपासून सुरु…!!!” गणपती बाप्पा मोरया…!!!

दरम्यान काही दिवसांपूर्वी प्रसादने “वडापाव : एका गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी” या चित्रपटाची घोषणा केली होती. लंडनमध्ये या चित्रपटाचे शुटींग सुरु झाले आहे. ‘वडापाव’ चित्रपटात प्रसाद ओकसह गौरी नलावडे, लक्ष्मीकांतचा बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे, रितिका श्रोत्री, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम रसिका वेंगुर्लेकर, सिद्धार्थ साळवी, शाल्व किंजवडेकर, सविता प्रभुणे हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi movie jilbi shooting started prasad oak shared post on instagram dpj