वादळ येणार! हवा नाही थेट वादळ येणार! या संवादाप्रमाणे सत्तेचं वादळ सध्या रसिक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. कारण हे सत्तेचं वादळ रोमांचक खुर्चीचा खेळ खेळण्यास सज्ज होत आहे. ‘खुर्ची’ चित्रपटाच्या ट्रेलरने ही हवा आणखी वेगाने वाहू लागली आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा दणक्यात पार पडला. या कार्यक्रमाला चित्रपटातील कलाकारांची उपस्थिती लक्षणीय ठरली.

‘खुर्ची’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये केवळ राडा पाहायला मिळाला आहे. ट्रेलरमध्ये सत्तेसाठीची लढाई पाहता नेमकं कोण बाजी मारणार? या प्रश्नाचं उत्तर चित्रपटगृहातच मिळेल. ट्रेलरवरून ही उत्सुकता अधिक ताणली गेली आहे. येत्या १२ जानेवारीला हा चित्रपट पाहून सत्तेसाठी लढल्या जाणाऱ्या लढाईतील विजेता कळेल.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

“…अन् माझा डावा हात दुखू लागला”, श्रेयस तळपदेने सांगितला हार्ट अटॅक आला त्या दिवसाचा घटनाक्रम; म्हणाला, “माझा चेहरा…”

संतोष कुसुम हगवणे प्रस्तुत ‘आराध्या मोशन फिल्म्स’,’ आणि ‘योग आशा फिल्म्स’ निर्मित या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा संतोष कुसुम हगवणे, योगिता गवळी आणि प्रदीप नत्थीसिंग नागर यांनी बरोबरीने सांभाळली आहे. डॉ. अमित बैरागी आणि आतिश अंकुश जवळकर यांची सहनिर्मिती असून राजकारणाचे विविध रंग या चित्रपटात रेखाटण्यात आले आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद निर्माते संतोष कुसुम हगवणे यांची असून दिग्दर्शक शिव धर्मराज माने आणि संतोष कुसुम हगवणे यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा उत्तमरीत्या पेलवली आहे. राहुल रामपाल या चित्रपटाचे सहदिग्दर्शन करत आहेत. तर, क्रिएटिव्ह हेड म्हणून प्रतिक वसंतराव पाटील यांनी बाजू सांभाळली आहे. चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी योगेश कोळी यांनी सांभाळली आहे.

दिग्गज अभिनेते नाना पाटेकरांचा मुलगा मल्हार काय काम करतो? जाणून घ्या

‘खुर्ची’ या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपटात राकेश बापट, अक्षय वाघमारे, आर्यन हगवणे, सुरेश विश्वकर्मा, महेश घाग, अभिनेत्री प्रीतम कागणे, कल्याणी नंदकिशोर, श्रेया पासलकर या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. याशिवाय अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनी ही चित्रपटात दमदार भूमिका साकारली आहे.

लग्नानंतर पाच वर्षांनी मराठी अभिनेत्री झाली आई, नववर्षाच्या दिवशी झालं गोंडस पाहुण्याचं आगमन, पोस्ट करत म्हणाली…

‘खुर्ची’ हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट येत्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजेच १२ जानेवारी २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा रोमांचक ट्रेलर पाहता ‘खुर्ची’चं राजकारण पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. मात्र यासाठी प्रेक्षकांना आणखी काही काळ वाट बघावी लागणार आहे.

Story img Loader