लवकरच एक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट जुन्या प्रथा, रितीरिवाज व आधुनिक विज्ञान यांच्या संघर्षावर भाष्य करणारा आहे. ‘लाईफ लाईन’ असं या आगामी मराठी चित्रपटाचं नाव आहे. नुकतीच सोशल मीडियावरून या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. ११ आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

या पोस्टरची झलक पाहता विषयाची उत्सुकता निर्माण होते. आधुनिक विज्ञान आणि जुन्या रीतिरिवाजांचा संघर्ष अशी संकल्पना असणाऱ्या ह्या चित्रपटात लोकप्रिय अभिनेते माधव अभ्यंकर आणि महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्राप्त अभिनेते अशोक सराफ प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. सोबतीला हेमांगी कवी, भरत दाभोळकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर अशी तगड्या कलाकारांची फौज आहे.

PM Narendra Modi Speech
Narendra Modi : आणीबाणी ते कलाकारांवर बंदी! नरेंद्र मोदींनी ‘हे’ पाच मुद्दे उपस्थित करत काँग्रेसला करुन दिली संविधानाची आठवण
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
chhaava movie new song aaya re toofan out now marathi actors historical looks
आया रे तुफान…; ‘छावा’च्या नव्या गाण्यात दिसली ‘या’ मराठी कलाकारांची झलक! समोर आले सिनेमातील ऐतिहासिक लूक, पाहा फोटो
bride surprised her groom by performing dance
लग्नातील जोडप्याचा ‘तो’ व्हायरल VIDEO तरुणींनी केला रिक्रिएट; अभिनय पाहून नेटकऱ्यांनी दिले पैकीच्या पैकी गुण
Bride dance Viral Video
‘नवरीनेच वरात गाजवली…’ नाचणाऱ्या घोड्यावर बसून केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नाद लागतो ओ..”
zee marathi new serial promo tula japanar ahe promo announces
तारीख अन् मुहूर्त ठरला! ‘झी मराठी’ची थ्रिलर मालिका ‘या’ दिवशी सुरू होणार; संपूर्ण स्टारकास्ट आली समोर, पाहा जबरदस्त प्रोमो
Ankush Chaudhari as Police officer
अंकुश चौधरी पहिल्यांदाच दिसणार पोलिसाच्या भूमिकेत; ‘पी. एस. आय. अर्जुन’ चित्रपटातील लूक पोस्टर रिलीज
Maha Kumbh Mela 2025
बापरे! कुंभमेळ्यात साधू महाराजांनी घेतली समाधी? त्याआधी काय काय केलं जातं पाहा; VIDEO होतोय तुफान व्हायरल

हेही वाचा – सुपरहिट चित्रपट, दोन घटस्फोट, तीन लग्नं अन्…; ऋषी कपूर यांची ‘ही’ हिरोईन आहे सुप्रसिद्ध क्रिकेटपटूची सासू

साहिल शिरवैकर दिग्दर्शित ‘लाईफ लाईन’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि गीत राजेश शिरवैकर यांचे आहेत. अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांना अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर यांचा आवाज लाभला आहे तर लालजी जोशी, कविता शिरवैकर, मिलिंद प्रभुदेसाई, संध्या कुलकर्णी, अमी भुता, संचीता शिरवैकर, उदय पंडीत, शिल्पा मुडबिद्री ‘लाईफ लाईन’ चे निर्माते आहेत. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

lifeline movie poster
चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित (फोटो – पीआर)

हेही वाचा – भव्य सेट, खरे दागिने अन्…; संजय लीला भन्साळींनी घेतले ६० कोटी, ‘हीरामंडी’चं बजेट किती? कोणाला किती मानधन मिळालं?

‘लाईफ लाईन’ चे तरुण दिग्दर्शक साहिल शिरवैकर म्हणाले, “सामाजिक भान आणि व्यावसायिक मूल्यं राखून हा चित्रपट आम्ही बनवलेला आहे. विधात्याने रेखाटलेली तळहातावरची ‘आयुष्य रेखा’ आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटातून केलेला आहे. अनोखी कथा, अनोखा संघर्ष, अनोखी मांडणी, अनोखी पात्रनिवड आणि तगड्या कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी ही या चित्रपटाची वैशिष्ट्यं म्हणता येतील. बाकी अशोक सराफ सर चित्रपटांच्या निवडीबाबत किती चोखंदळ असतात हे सर्वांना माहीत आहेच. त्यांनी आमचा चित्रपट स्विकारला म्हणजे विषय संपला.”

या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे, पण तो सिनेमागृहांमध्ये कधी प्रदर्शित होणार, याबाबत अद्याप निर्मात्यांनी माहिती दिलेली नाही.

Story img Loader