‘नाद – द हार्ड लव्ह’ हा मराठी चित्रपट सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिला आहे. दिमाखदार संगीत प्रकाशन सोहळ्यानंतर या चित्रपटाचा लक्षवेधी टीझर रसिकांच्या भेटीला आला आहे. ‘नाद’चा टीझर समाजमाध्यमांवर प्रदर्शित करण्यात आला असून यात एक संगीतमय प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट २५ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

शकुंतला क्रिएशन प्रॉडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकरच्या बॅनरखाली निर्माते संजय पगारे आणि रुपेश दिनकर यांनी ‘नाद – द हार्ड लव्ह’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केलं असून टीझरची सुरुवातच मुळात ‘नाद’ची व्याख्या सांगणारी आहे. टीझरमध्ये गावाकडच्या लाल मातीतून नागमोडी वाट काढत जाणारा काळाभोर डांबरी रस्ता आणि त्यावर बुलेटची सवारी करणारा नायक लक्ष वेधून घेतो.

lakshmi niwas jayant real face reveal
आधी झुरळ खाल्लं, आता घडणार ‘असं’ काही…; जान्हवीसमोर येतंय जयंतचं वेगळंच रुप! नेटकरी म्हणाले, “हिंदी मालिकेची कॉपी…”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
tharla tar mag sayali and arjun express love for each other
ठरलं तर मग! अर्जुनने पहिल्यांदाच वाजवली बासरी, सायलीने गायलं गाणं! गुडघ्यावर बसून स्वीकारणार लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट, पाहा प्रोमो
Mumbai Municipal Corporations budget 2025 is tomorrow
पालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईकरांना काय मिळणार? मुंबई महानगरपालिकेचा उद्या अर्थसंकल्प
amit bhanushali birthday on set villain priya new look grabs attention
Video : ‘ठरलं तर मग’च्या सेटवर अर्जुनच्या वाढदिवसाची धमाल! खलनायिका प्रियाच्या नव्या लूकने वेधलं लक्ष, मिळाली मोठी हिंट
Controversy About These Movies
Controversy : ‘छावा’च नव्हे ‘या’ चित्रपटांमधल्या दृश्यांवरही जोरदार आक्षेप; वादाचं ग्रहण लागलेले चित्रपट कुठले?
Chhaava Movie Controversy Political Reactions Udayanraje Bhosale sambhajiraje Chhatrapati
ऐतिहासिक चित्रपट, वादग्रस्त दृष्य व राजकीय वाद,’छावा’च्या बाबतीत नेमकं काय घडतंय?
marathi actor shares his opinion on chhaava movie
“लहान तोंडी मोठा घास, पण…”, ‘छावा’चा ट्रेलर पाहून मराठी अभिनेत्याने व्यक्त केली ‘ती’ खंत; विकी कौशलबद्दल म्हणाला…

हेही वाचा >>> ‘दि ए आय धर्मा स्टोरी’चे २५ ऑक्टोबरला प्रदर्शन

‘नाद’ म्हणजेच ध्यास जेव्हा श्वासातून रक्तात उतरतो, तेव्हा काय होतं ते टीझरमध्ये सांगितलं आहे. थोडक्यात काय तर गावाकडच्या लाल मातीत, हिरवा शालू नेसलेल्या शेतात रंगलेली रांगडी प्रेमकथा ‘नाद’मध्ये पाहायला मिळेल हे टीझर पाहिल्यावर जाणवतं. प्रेम हा शब्द लिहायला, वाचायला, म्हणायला जरी सोपा असला तरी प्रेम झाल्यावर किती आव्हानांना सामोरं जावं लागतं त्याची झलकही यात आहे. सुरेल गीत-संगीत ही या चित्रपटाची जमेची बाजू ठरणार आहे, असे दिग्दर्शक प्रकाश पवार यांनी सांगितले.

‘नाद’ची कथा संतोष दाभोळकर आणि दीपक पवार यांनी, तर पटकथा व संवादलेखन डॉ. विनायक पवार यांनी केलं आहे. वैभव देशमुख यांच्या साथीने विनायक पवार यांनी गीतलेखनही केलं असून ही सर्व गाणी पंकज पडघन यांनी संगीतबद्ध केली आहेत. ‘देवमाणूस’ मालिकेतील अभिनेता किरण गायकवाड आणि सपना माने या नव्या कोऱ्या जोडीची कमाल या चित्रपटात रसिकांना भुरळ पाडणार आहे. याखेरीज यशराज डिंबळे, तानाजी गालगुंडे, किरण माने, विजय पाटकर, जयवंत वाडकर, कमलेश सावंत, सूरज पवार, विनायक पवार, श्रीकांत गायकवाड, गणेश पदमाळे, आशिष वारंग आदी कलाकारांनीही या चित्रपटामध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत.

Story img Loader