भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित ‘टीडीएम’ हा चित्रपट २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. राज्यात ज्या ज्या थिएटर्समध्ये चित्रपट प्रदर्शित झाला, तिथे त्याला चांगलं ओपनिंग मिळाल्याचं म्हटलं जात आहे. पण, बऱ्याच ठिकाणी टीडीएम चित्रपटाचे शो कॅन्सल केले जात आहेत, तसेच चित्रपटाला प्राईम टाईम मिळत नसल्याचं दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे व टीमचं म्हणणं आहे. अशातच एका थिएटरमध्ये चित्रपटाबद्दल बोलताना भाऊराव कऱ्हाडे, मुख्य अभिनेता पृथ्वीराज थोरात व अभिनेत्री कालिंदी यांना अश्रू अनावर झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – ३२ हजार महिलांचं धर्मांतर केल्याचा दावा, ‘द केरळ स्टोरी’बद्दल शशी थरूर यांचं खुलं आव्हान; म्हणाले, “४ मेपर्यंत पुरावे द्या अन्…”

भाऊसाहेब म्हणाले, “मला शोसाठी वेळ द्या, आमचा सिनेमा चालला नाही तर घेऊ नका, पण किमान आमचा चित्रपट दाखवा लोकांना आणि लोकांना ठरवू द्या तो कसा आहे ते. या चित्रपटगृहाचेच उदाहरण घ्या एवढे लोक आमचा सिनेमा बघायला इथे आले आहेत म्हणून आम्ही त्यांना विनंती केली की आम्हाला आणखी एक शो द्या, पण त्यांनी तो दिला नाही. हा असा भेदभाव आमच्याबरोबर केला जात असल्याने आता माझी चित्रपट बनवण्याची इच्छा राहिलेली नाही. लोकांना चित्रपट बघायचा असूनही त्यांना बघू दिला जात नाही. आम्ही वितरकांना विचारतो तेव्हा ते म्हणतात की आम्हाला ‘वरून’ आदेश आहे की आमच्या चित्रपटाचा एकच शो दाखवायचा. आमचा चित्रपट पाहिलेल्या एकही व्यक्तीने चित्रपटावर टीका केलेली नाही, त्यामुळे आमच्याबरोबर हा भेदभाव करणेणे चुकीचे आहे.”

“तुझं आयुष्य फक्त पार्टी आणि मुली…’, जिया खानने सुसाईड नोटमध्ये सूरज पांचोलीबद्दल केलेले खुलासे; म्हणालेली, “मला गरोदर…”

यावेळी चित्रपटाचा मुख्य अभिनेता पृथ्वीराज थोरात म्हणाला, “तुम्हीच हा चित्रपट मोठा करू शकता, आम्हाला शो मिळत नाहीयेत. आम्ही तुम्हा सर्वांना विनंती करतोय की आमच्या कष्टाचं चीज व्हावं, यासाठी तुम्ही सर्वांनी मदत करा. चित्रपट खूप चांगला आहे, तो लोकांनी पाहायला हवा, आम्ही दुसऱ्या चित्रपटांबद्दल काहीच बोलत नाही. लोकांना ठरवू द्या कोणता चित्रपट चांगला आहे ते,” असं तो म्हणाला.

दरम्यान, सोशल मीडियावरही या चित्रपटाबद्दल चाहते पोस्ट टाकत आहेत. चित्रपट उत्तम आहे, पण शो मिळत नसल्याचंही सोशल मीडियावर बोललं जात आहे. कलाकारांचा थिएटरमधील व्हिडीओही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi movie tdm actors cried in theatre after not getting prime time hrc