नाटक, चित्रपट आणि छोट्या पडद्यावरील मालिकांमुळे अभिनेता संकर्षण कऱ्हाडे घराघरांत लोकप्रिय झाला. ‘माझी तुझी रेशीमगाठ’, ‘आम्ही सारे खवय्ये’ या कार्यक्रमांमुळे त्याला विशेष प्रसिद्धी मिळाली. सध्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकाच्या निमित्ताने संकर्षण अमेरिका दौऱ्यावर गेला आहे. अमेरिकेत जवळपास ३६ दिवस राहून या टीमने १३ शहरांमध्ये नाटकाचे प्रयोग केले. या प्रयोगादरम्यान अभिनेत्याला कसा अनुभव आला? याविषयी माहिती देण्यासाठी त्याने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे.
हेही वाचा : “टोल कुणाच्या खिशात जातोय?” तेजस्विनी पंडितने शेअर केला फडणवीसांचा व्हिडीओ; म्हणाली, “राजसाहेब तुम्हीच…”
संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट
thankyou #america LOVE YOU भारत
नियम व अटी लागू नाटकाचा आज अमेरिकेतला १३ प्रयोगांचा दौरा संपूर्ण झाला.. आजच्या #tampa च्या प्रयोगाला सुद्धा जोरदार प्रतिसाद मिळाला.
एकूण ३६ दिवस, २१ विमान प्रवास, हजारो मैलांचं अंतर, १३ शहरं, नाटकाच्या सगळ्या प्रयोगांना मिळून आलेले, भेटलेले, जवळपास ५००० मराठी रसिक प्रेक्षक आणि मिळालेलं अगणित प्रेम.अमेरिकेच्या ह्या दौऱ्यात खूप प्रेम मिळालं. नाटक सगळ्या प्रेक्षकांना खूप आवडलं. प्रयोगाच्या निमित्ताने १३ वेगवेगळ्या शहरांतल्या मराठी कुटुंबांच्या घरी राहाता आलं.. त्यांनी खूप प्रेम दिलं…काही ठिकाणी माझ्या घरच्यासारखा गणेशोत्सव होता, तर काही घरातल्या हातची चव अगदी माझ्या आईच्या हातची.. काही ठिकाणी औक्षण करुन स्वागत झालं तर , काही ठिकाणी निरोप द्यायला सगळं कुटुंब दारात ऊभं बघून मलाही रडू आलं..
कामासाठी , नोकरीसाठी , कुटुंबासाठी आपल्या “भारतापासून” सातासमुद्रापार असलेली ही सगळी मराठी माणसं, कुटुंब त्यांच्यातली रसिकता पूरेपूर टिकवून आहेत… हे सगळं समृद्ध करणारं आहे..ह्या सगळ्यासाठी THANK YOU अमेरिका आणि आता उद्या सुरू होणार परतीचा प्रवास आपल्या भारताकडे… फार फार आठवण येतीये. आता कान आतूर झालेत ऐकायला की , कुछ ही समय बाद हमारा विमान मुंबई के छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय हवाई अड्डे पर उतरेगा ११ oct ला पहाटे पोचतो आणि मग भेटूच.
दरम्यान, संकर्षण कऱ्हाडे प्रमुख भूमिका साकारत असलेल्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकामध्ये संकर्षणसह अमृता देशमुख आणि प्रसाद बर्वे हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.