‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’फेम गायिका आर्या आंबेकर नेहमी चर्चेत असते. आपल्या सुरेल आवाजाने आर्याने अनेकांना मंत्रमुग्ध केलं आहे. आर्याचा वेगळा मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावर आर्या मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. २०२३ साल संपायला शेवटचे ३१ दिवस राहिले आहेत. दरम्यान, सरत्या वर्षाच्या अखेरीस आर्याने चाहत्यांना एक खास चॅलेज दिलं आहे. काय आहे ते चॅलेंज घ्या जाणून.
हेही वाचा- “त्यांना अशीच उत्तरं…”, सिद्धार्थ चांदेकरने ट्रोलिंगबद्दल मांडलं स्पष्ट मत; म्हणाला, “जे लोक अपमान…”
आर्याने तिच्या इन्स्टाग्रामवर तिचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत आर्याने चाहत्यांना एक चॅलेंजही दिलं आहे. फोटो शेअर करत आर्याने लिहिलं “सर्वांसोबत एक गोष्ट शेअर करायची आहे. बघता बघता डिसेंबर महिना सुरू झाला आणि नवीन वर्ष सुरू होण्यासाठी फक्त ३१ दिवस राहिलेत. या वेळात मी स्वत:ला सोशल मीडियापासून दूर ठेवणार आहे आणि इतर गोष्टींना प्राधान्य देणार आहे. आपल्या आयुष्यात आजूबाजूला सतत डिजिटल गोंधळ सुरू असतो. त्यापेक्षा हे ३१ दिवस मन:शांतीसाठी वैयक्तिक ध्येयाकडे लक्ष देण्यासाठी, मूल्य, नाती सांभाळण्यासाठी आणि एक चांगला माणूस होण्याकडे लक्ष देऊया. तुम्हीही माझ्यासोबत हे आव्हान स्वीकाराल का?”
आर्याने पुढे लिहिले, “सुप्रभात! डिसेंबर महिना सुरू झाला आहे आणि नवीन वर्ष सुरू व्हायला फक्त ३१ दिवस बाकी आहेत!! हा वेळ आपण social media पासून थोडं दूर राहून, स्वतःला आणि आपल्या mental health ला देऊयात का?! आपली व्यक्तिगत ध्येय, मूल्य या सगळ्यांवर पुन्हा विचार करण्यासाठी हा वेळ घेऊया!!”
हेही वाचा- “लक्ष्मीकांत यांनी मला राजकारणात…”, प्रिया बेर्डे यांचे थेट वक्तव्य, म्हणाल्या “बाई तू तुझा…”
ही पोस्ट शेअऱ करत आर्याने चाहत्यांना एक महिना सोशल मीडियापासून लांब राहण्याचं चॅलेंज दिलं आहे. आर्याची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. आर्या आंबेकरच्या या चॅलेंजला चाहत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. एकाने “खूपच छान कल्पना आहे आणि प्रयत्न करायला काहीच हरकत नाही”, अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्याने “होय नक्कीच, मीसुध्दा तुझ्या सोबत हे करून पाहतो”, अशी कमेंट केली आहे.