सौमित्र अर्थात किशोर कदम हे मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेते आणि कवी म्हणून ओळखले जातात. आपल्या कवितेच्या माध्यमांतून ते सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर भाष्य करतात. नुकतीच सौमित्र यांनी थिंक बॅंक या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी कवितेचं बदलंत स्वरूप, गाणं आणि कवितेमधील फरक अशा अनेक विषयांवर आपलं मतं मांडलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : “तिचा अहंकार, नखरे…”, अमीषा पटेलबद्दल ‘गदर २’च्या दिग्दर्शकाने मांडलं मत, म्हणाले, “मोठ्या घरची मुलगी…”

गाणं हे कवितांपेक्षा कमी असतं का? यावर किशोर कदम म्हणाले, “अजिबातच नाही… ज्या माणसाला चांगलं गाणं लिहिता येत नाही, तो चांगली कविता लिहू शकत नाही. मुक्तछंदातील कवितेत सुद्धा सुप्त गाणं असतं.”

हेही वाचा : बिग बॉस गाजवणाऱ्या ‘या’ लोकप्रिय मराठी अभिनेत्रीला ओळखलंत का? लवकरच अडकणार आहे विवाहबंधनात

कवितांच्या विविध प्रकारांविषयी सांगताना ते पुढे म्हणाले, “माझे अनेक मित्र मला तुम्ही रोमॅंटिक कवी आहात असं म्हणतात. पण, कवितेतून प्रेम व्यक्त करणं कमीपणाचं नसतं. माझं मत विचाराल तर जो माणूस कविता लिहितो, तो प्रत्येक माणूस रोमॅंटिक असतो. रोमॅंटिक असल्याशिवाय तुम्हाला कविता लिहिताच येऊ शकत नाही. त्यामुळे रोमॅंटिक कवितांवरुन जे लोक हिणवतात त्यांना कविता कळत नाही असं मला वाटतं.”

हेही वाचा : ढोल वाजवणारे स्त्री-पुरुष, झिम्मा-फुगडीचा देखावा अन्…; अक्षया देवधरच्या मंगळागौरीतील रुखवत पाहिलंत का?

“कवितेत किंचित नाट्य हवं, किंचित वेडेपणा पाहिजे, दोन घोट दारू, थोडासा ओलावा, तर थोडंसं राजकारण आणि प्रेमही पाहिजे. एका कवितेत या सगळ्या गोष्टी येऊ शकतात आणि मला वाटतं या सगळ्या गोष्टी ज्यात येतात ती कविताचं उत्तम असते.” असं सौमित्र यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi poet saumitra aka kishor kadam talks about romantic poem sva 00
Show comments