मराठी चित्रपटसृष्टीतील बोल्ड व बिनधास्त अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरला ओळखले जाते. आपल्या अभिनयाच्या जोरावर सईने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावर सई मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअऱ करत ती चाहत्यांना अपडेट देत असते. चित्रपटाबरोबर सई आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते.

नुकतेच सईने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या करिअरबाबत अनेक खुलासे केले आहेत. सई म्हणाली, एका चित्रपटासाठी माझी निवड झाली होती. शुटिंगच्या दोन दिवस अगोदर मला कळालं की मला बदलण्यात आलं आहे. माझ्या डोळ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे असं त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे म्हणणं होतं. त्यानंतर मला खूप खचल्यासारखं वाटत होतं.”

mlas urged prioritizing crime prevention and sand smuggling before planning expenditure in committee meeting
“यवतमाळात गुन्हेगारी, वाळू तस्करांची दादागिरी वाढली; आधी ते रोखण्याचे ‘नियोजन’ करा, मग…” लोकप्रतिनिधी आक्रमक
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Nana Patole on Ravindra Dhangekar
Nana Patole: रवींद्र धंगेकर काँग्रेसचा हात सोडणार? प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “काही लोक व्यावसायिक…”
Yogi Adityanath News
Yogi Adityanath : योगी आदित्यनाथ यांचा आरोप, “आपने बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांना बनावट आधार कार्ड..”
Walmik Karad, Dhananjay Munde
“फरार असताना वाल्मिक कराडने संपत्तीचं…”, ठाकरे गटाला वेगळाच संशय; धनंजय मुंडेंचा उल्लेख करत म्हणाले…
ashish shelar uddhav thackeray (2)
“करगोटा निसटायच्या वयात…”, शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले, “अमित शाहांच्या पाठीवर वळ…”
Saif Ali Khan Records Statement With Mumbai Police
हल्ला झाला तेव्हा करीना कपूर कुठे होती? स्वतः सैफनेच पोलिसांना सांगितलं; जबाबात म्हणाला, “मी हल्लेखोराला…”
Sanjay raut on balasaheb thackeray
Sanjay Raut : “…तर वीर सावरकरांचाही गौरव ठरेल”, बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न देण्याच्या मागणीवरून संजय राऊतांचं विधान चर्चेत!

सई पुढे म्हणाली, “जेव्हा आपल्या वाटत असतं की सगळं संपलं आहे. तर आपण या गोष्टीवर विश्वास ठेवायला हवा की हा काळही सरणार आहे. मी ज्या परिस्थितीतून गेले त्या परिस्थितीने मला प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुमची एकाग्रता कशी ढळू दयायची नाही हे शिकवलं. त्या दिग्दर्शकाला माझ्यात जी उणीव दिसली होती. लोकं त्याच गोष्टीसाठी माझे खूप कौतुक करतात.

हेही वाचा- होणाऱ्या नवऱ्याच्या आठवणीत पूजा सावंतची खास पोस्ट, सिद्धेश म्हणाला, “तुला भेटण्याची…”

सईच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर आत्तापर्यंत तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. मराठीबरोबर बॉलीवूडमध्येही सईने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे, येत्या २ फ्रेबुवारीला तिचा ‘श्रीदेवी प्रसन्न’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर सिद्धार्थ चांदेकरची प्रमुख भूमिका आहे.

Story img Loader