‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मधून घराघरात पोहोचलेली गायिका केतकी माटेगावकर आता उत्तम अभिनेत्री देखील झाली आहे. ‘तानी’, ‘शाळा’, ‘काकस्पर्श’, ‘टाइमपास’, ‘फुंतरू’ यांसारख्या चित्रपटातून तिनं आपल्या अभिनय कौशल्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता केतकीचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘अंकुश’ असं या चित्रपटाच नाव असून यामध्ये ती रावीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. अशातच केतकीनं एका एंटरटेन्मेंट मीडियाशी बातचित करताना स्वतःच्या लग्नाविषयी खुलासा केला.

हेही वाचा – कोकणची शान नेहा पाटीलला मिळाला लावणी सम्राज्ञीचा मान; ठरली ‘ढोलकीच्या तालावर’ची विजेती

हेही वाचा – Video: सागर कारंडे बऱ्याच काळानंतर दिसला पोस्टमनच्या भूमिकेत, ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या मंचावर घेऊन आला सुरेश वाडकरांसाठी पत्र

‘अल्ट्रा मराठी बझ’ या एंटरटेन्मेंट युट्यूब चॅनेलच्या रॅपिड फायर सेगमेंटमध्ये केतकी माटेगावकर सहभागी झाली होती. यावेळी तिला विचारलं गेलं की, ‘केतकी लग्न कधी करणार आहेस?’ यावर ती म्हणाली की, “झालंय लग्न. आता काय?”

त्यानंतर केतकीला पुन्हा विचारलं की, “खरं लग्न कधी करणार?” तर ती म्हणाली, “केतकीचं लग्न झालं आहे. म्युझिकबरोबर… एकेदिवशी माझ्या आजीने मला लग्न कर म्हणून भंडावून सोडलं होतं. मग तिला मी माझ्या बोटावर असलेला टॅटू दाखवला आणि सांगितलं, मी म्युझिकबरोबर लग्न केलं आहे. जो कोणी आता माझ्या आयुष्यात येईल ते माझं दुसरं लग्न असेल. माझा पहिला नवरा हे म्युझिक आहे. त्यामुळे दुसऱ्या नवऱ्याला पहिल्या नवऱ्याशी जमवून घ्यावं लागेल, असं सांगेन.”

हेही वाचा – “…म्हणून माझा भाऊ मला म्हणतो घंटागाडी”; ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीने सांगितली टोपण नावाची यादी

दरम्यान, केतकी माटेगावकरचा नवा ‘अंकुश’ चित्रपट ६ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शकाची धुरा निशांत नाथाराम धापसे यांनी सांभाळली आहे. या चित्रपटात केतकी व्यतिरिक्त दीपराज, सयाजी शिंदे, मंगेश देसाई, शशांक शेंडे, भारत गणेशपुरे, नागेश भोसले, गौरव मोरे, चिन्मय उदगीरकर, ऋतुजा बागवे, पूजा नायक अशी जबरदस्त कलाकार मंडळी आहेत.

Story img Loader