महाराष्ट्रातील नागपूर-मुंबई ‘द्रुतगती समृद्धी महामार्गा’ची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. या बहुप्रतिक्षित महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या ५२० किमी टप्प्याचे लोकार्पण ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. गायक-संगीतकार अवधूत गुप्तेने याबाबतच एक गाणं तयार केलं आहे. त्याने समृद्धी महामार्गावर आधारित गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवधूतसह हे गाणं वैशाली सामंत, स्वप्निल बांदोडकर यांनी गायलं आहे. अवधूतने या गाण्याचा व्हिडीओ शेअर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. अवधूत म्हणाला, “आली आली समृद्धी! केवळ या गीताचा कवी-संगीतकार म्हणून नव्हे, तर एक महाराष्ट्रीय आणि भारतीय म्हणून आज माझा उर अभिमानाने प्रचंड भरून आलेला आहे. दहा वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या फ्लॅटचा ताबा घेताना जो आनंद होतो, तसा काहीसा अतिशय वैयक्तिक आनंद झाला आहे.”

पाहा व्हिडीओ

“गेला रविवार हा खरोखर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस ठरला. केवळ कोकण आणि विदर्भच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राला एकसंध बांधणारा बंध ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग‘ हा भारताचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी साहेबांच्या हस्ते उद्घटीत होऊन सर्वसामन्यांना वाहतुकीसाठी खुला झाला.”

आणखी वाचा – “आमचं कोकणही गेली १२ वर्षे…” समृद्धी महामार्ग उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर मराठी अभिनेत्याची संतप्त पोस्ट

पुढे तो म्हणाला, “आधीच सुजलाम् सुफलाम् असलेल्या माझ्या महाराष्ट्राची ताकद आता या समृद्धी महामार्गामुळे दुप्पट होणार आहे. या एकाच मार्गावर नारळी पोफळीच्या बागांपासून संत्र्यांच्या शेतांपर्यंत बदलत जाणारा निसर्ग, गाडीच्या काचेतून पाहायला जो काही आनंद होणार आहे, त्याचा विचार करता, माझ्यातल्या ‘ट्रॅव्हलरला‘ कधी एकदा गाडीला स्टार्टर मारतोय असं झालंय! प्रवासाचा वेळ अर्ध्यावर आल्यामुळे आपल्या सर्वांच्या आयुष्याची लांबी दुप्पटीनं वाढली आहे. जणू काही मायमराठीने औक्षण करून दीर्घायुष्याचा आशीर्वादच दिला आहे. या महामार्गामुळे निर्माण होणारा रोजगार आणि येणारी सुबत्ता ही नक्कीच महाराष्ट्राच्या उज्वल आणि समृद्ध भविष्याची चाहूल देते आहे.” हे गाणं गाण्याची संधी मिळाल्यामुळे अवधूतही खूप खुश आहे.