आपल्या सुरेल आवाजाच्या जोरावर रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या लोकप्रिय गायिका आशा भोसले आज आपला ९० वा वाढदिवस साजरा करत आहे. आशा भोसले यांना संगीताचा वारसा त्यांच्या घरातूनच मिळाला होता. वडील दिनानाथ मंगेशकर आणि बहिण लता मंगेशकर यांच्या पावलावर पाऊल ठेवत आशाताईंनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पार्श्वगायिकेच्या रुपात आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली. १९४३ च्या दरम्यान आशाताईंच्या सांगितिक कारकीर्दीला सुरुवात झाली.
हेही वाचा- “…म्हणून माझे चित्रपट सुपरहिट होत नाही”; प्राजक्ता माळीने सांगितलं कारण
संगीत क्षेत्राबरोबर इतर अनेक क्षेत्रामधून आशा भोसले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. प्रसिद्ध गायिका सावनी रविंद्रने आशा भोसलेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सावनीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये सावनीने आशा भोसलेंबरोबरचे दोन फोटो शेअर केला आहे. पहिल्या फोटो सावनी त्यांच्या पाया पडताना दिसत आहे. पोस्ट शेअर करत सावनीने लिहिलं आहे. “माझ्याकडे देव माझा पाहतो आहे”. सावनीच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत आशा भोसलेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
शाद, ओ.पी. नय्यर, खैय्याम, रवी, एस.डी. बर्मन, आर.डी. बर्मन, शंकर-जयकीशन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, उषा खन्ना, इलियाराजा, ए.आर. रेहमान आणि अशा इतरही संगीतकारांसह आशा भोसले यांनी काम केले आहे. मराठी, हिंदी, आसामी, गुजराती, पंजाबी, तमिळ, उर्दू, बंगाली अशा विविध भाषांमध्येही त्यांनी अनेक गाणी गायली आहेत. मराठीतील त्यांची ‘दिस जातील दिस येतील’, ‘फुलले रे क्षण माझे’, ‘स्वप्नात साजना येशील का’ गाणी चांगलीच गाजली.