उत्कर्ष शिंदे मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय गायक आहे. आत्तापर्यंत त्याने अनेक सुपरहिट गाण्यांना आपला आवाज दिला आहे. गायनाबरोबर उत्कर्षने अभिनय क्षेत्रातही पदापर्ण केलं आहे. ‘बिग बॉस मराठी’मधून उत्कर्ष घराघरांत पोहचला. सोशल मीडियावर उत्कर्ष मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांना अपडेट देत असतो. दरम्यान, उत्कर्षने आपल्या इन्स्टाग्रामवर अभिनेता जितेंद्र जोशीसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्याने जितेंद्र जोशीचे कौतुक केले आहे.

हेही वाचा-

Heena Gavit Resigns from BJP
Heena Gavit : भाजपाला मोठा धक्का, हिना गावितांचा पक्षाला रामराम; अक्कलकुव्यात शिंदेंच्या शिवसेनेला आव्हान
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
amchi dena bank lena bank nahi cm Eknath Shinde criticized opposition on Monday
आमची देना बँक आहे, लेना बँक नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कल्याणमध्ये विरोधकांवर टीका
Sharad Ponkshe
Sharad Ponkshe : “मी शिंदे गटाचा उपनेता फक्त नावाला…”, मनसेच्या व्यासपीठावरून शरद पोंक्षेंची शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका
Jitendra Joshi
जितेंद्र जोशीने चोरलेला ‘या’ दिग्गज बॉलीवूड अभिनेत्याचा फोटो; म्हणाला, “त्यानंतर जो मार खाल्ला…”
Akshay Kumar And Shreyas Talpade
“पहिल्या दिवसापासून त्याने मला…”, श्रेयस तळपदेने सांगितला अक्षय कुमारबरोबर काम करण्याचा किस्सा; म्हणाला…
bigg boss marathi irina rudakova wishes happy bhaubeej to dhananjay powar
“Happy भाऊबीज भावा”, कोल्हापुरात धनंजय पोवारने केलेला पाहुणचार पाहून इरिना भारावली! म्हणाली, “नुसतं प्रेम…”
arvind sawant
“तेव्हा मी त्यांची लाडकी बहीण होती, पण आता…”; ‘त्या’ विधानावरून शायना एनसींचं अरविंद सावतांवर टीकास्र!

उत्कर्ष शिंदेने लिहिलं, “निसर्ग तुमच्या उत्कर्षासाठी आपोआप गोष्टी घडवतो असं माझं मत आहे. चार्ल्स डार्विनने ‘सक्षम ते जगतील’ “survival of fittest”असं सांगणारा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला. म्हणजेच जे सजीव त्या वेळच्या पर्यावरणास जुळवून घेण्यास सक्षम असतील तेच सजीव पुढील काळात जगतील असे त्यांनी मांडले. माझ्या आयुष्यातही असाच एक चार्ल्स डार्विन आहे. गुरुस्थानी ठेवावी अशी व्यक्ती. ”द जितेंद्र जोशी”, “मराठीची समज, संवेदनशील अभिनेता, नीडर वक्ता, रोकठोक व्यक्तिमत्व”; आतापर्यंत अनेक उत्कृष्ट कलाकृती, मग सेक्रेट गेम्स असो किंवा नुकताच आलेला गोदावरी, नाळ २ असो. मराठी सिनेविश्वाला नेहमी त्याच्या अभिनयातून, गीतातून, कवितांमधून वेगळं काही तरी देणारा अवलिया. माझ्यासाठी कलाविश्वात गुरुस्थानी असलेला कलाकार, व्यक्तिमत्व म्हणजे “द जितेंद्र जोशी.“ नेहमी भेटल्यावर मोठ्या भावाप्रमाणे आधी काळजीपोटी माझ्या खांद्याच्या झालेल्या दुखापतीची विचारपूस करणारा. नुसती विचारपूस नाही तर स्वतः शोल्डर मूवमेंट स्ट्रेंथट्रेनिंग करून घेणारा. उत्कर्ष, तू आता अभिनय क्षेत्रात आला आहेस, खूप काम कर, कामात मज्जा-आनंद घे; जसं चार्ल्स डार्विन सजीवांबद्दल सांगतात.”

उत्कर्षने पुढे लिहिलं, “जगण्याच्या ह्या स्पर्धेत जीव एकमेकांशी स्पर्धा करत असतात. ही स्पर्धा जीवघेणी असते. या स्पर्धेमध्ये जो जीव जिंकण्यासाठी आवश्यक गुणधर्म दाखवतो तोच जीव तग धरून राहतो आणि तोच जीव टिकतो. कारण निसर्गामध्ये सुयोग्य म्हणजेच योग्य असेच जीव जगतात व बाकीचे जीव मरतात. असाच काही मला नेहमी नकळतपणे गप्पा मारत मार्गदर्शन करणारा, मराठी सिनेमाची दिशा समजाऊन सांगणारा, कॉम्पिटिशन स्ट्रगल हार्डवर्कबद्दल मार्गदर्शन करणारा, प्रेक्षकांच्या आवडी निवडीबद्दल सतर्कता ठेवत सांगणारा. अभिनय क्षेत्रात दिशा, कन्सिस्टन्सी (नियमितपणा), ह्याचं महत्त्व सांगत संस्कार करणारा, सुतार पक्ष्याचं उदाहरण देत “लगे रेहनेका भाई, बाकी सब हो जाता है”, म्हणजेच सगळं विसरून, कामात झोकून द्यायचं; मग स्वतःची त्या झाडात सुंदर कुपी तयार होतेच. आकाशाला गवसणी घातलेला जमिनीवरचा माणूस, असा हा माझा गुरुस्थानी असलेला मोठा भाऊ, माझा चार्ल्स डार्विन “जितू दादा.”

हेही वाचा- श्रेयस तळपदेच्या पत्नीने पोस्ट करून अभिनेत्याच्या प्रकृतीबद्दल दिली महत्त्वाची अपडेट; म्हणाली…

उत्कर्ष शिंदेची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर लाईक्स व कमेंट्स केली आहे. गायन आणि अभिनयाबरोबरच आता शिंदे घराण्याने व्यवसाय क्षेत्रातही पाऊल ठेवलं आहे. शिंदे कुटुंबाने पंढरपूर येथील वेळापूरमध्ये स्वतःचा पेट्रोल पंप सुरू केला आहे. आदर्श आनंद शिंदे असं या पेट्रोल पंपाला नाव देण्यात आलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत उत्कर्ष शिंदेने ही आनंदाची बातमी दिली होती.