गायक रोहित राऊत आणि संगीतकार प्रशांत नाकती यांचं मराठमोळं गाणं ‘नखरेवाली’ प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याच्या हूकस्टेप अगदी मनात बसणाऱ्या आहेतच शिवाय हे गाणं ऐकल्यावर पाय आपोआप थिरकायला देखील लागतात. या गाण्यात निक शिंदे, रितेश कांबळे, अनुश्री माने आणि ‘जाऊ बाई गावात’ या मराठी रिअॅलिटी शोची फायनलिस्ट अंकिता मेस्त्री हे कलाकार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गायक रोहित राऊत व गायिका सोनाली सोनवणे हिने गाण्याला आवाज दिला आहे. या गाण्याचं संगीत प्रशांत नाकती आणि संकेत गुरव यांनी दिलं आहे. या गाण्याचं दिग्दर्शन रोहित जाधव याने केलं असून या गाण्याचं छायाचित्रीकरण सुरज राजपुत याने केलं आहे. अभिनेता विशाल निकम, गायक रोहित राऊत, गायिका जुईली जोगळेकर, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे खासगी सचिव अविनाश सोलवट आणि अन्य कलाकार यांच्या प्रमुख उपस्थितीत या गाण्याचा प्रीमियर सोहळा नुकताच पार पडला.

१७ व्या वर्षी सोडलं घर, चाळीत राहून केला संघर्ष, नकारामुळे आत्महत्येचे विचार अन्…; आता….

गायक रोहित राऊत ‘नखरेवाली’ गाण्याविषयी म्हणाला, “जेव्हा प्रशांत सरांचा मला कॉल आला तेव्हा मला खूप आनंद झाला. कारण मराठी म्युझिक अल्बम इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात टॉपची गाणी प्रशांत सरांची असतात. आणि त्यांच्यासोबत माझ हे पहिलंच गाणं आहे. हे गाणं रेकॉर्ड करतानाही मला खूप मज्जा आली. हे गाणं खूप एनर्जेटिक झालं आहे, त्यामुळे प्रेक्षकांना हे गाणं नक्कीच आवडेल.”

Video: अभिषेक बच्चनने ऐश्वर्या व लेकीसह केलं एंजॉय; आराध्याचा नवा लूक पाहून नेटकरी म्हणाले, “इतक्या वर्षांनी हिचं…”

संगीतकार प्रशांत नाकती गाण्याविषयी म्हणाला, “नखरेवाली हे गावरान मराठमोळं एक लव्ह साँग आहे. मुलींचे निरागस आणि सोज्वळ नखरे टिपणारं हे गाणं आहे. या गाण्याचं चित्रीकरण नाशिकच्या एका सुंदर गावात झालं आहे. आजचा काळ मॉडर्न झाला आहे तरीपण गावकडचं निरागस प्रेम वेगळ्या रीतीने मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. गाण्यातील चारही कलाकार उत्तम डान्सर आहेत. हे गाणं ऐकल्यावर आपोआप पाय थिरकू लागतील.”

अभिनय नाही तर गर्लफ्रेंडसाठी थिएटर केलेलं जॉइन, प्रसिद्ध अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “तिथे खूप सुंदर मुली होत्या पण…”

पुढे तो म्हणाला, “दरवर्षी पाच मार्चला २०२१ पासून गाणं प्रदर्शित करत आहे. २०२१ ला मी केलेलं ‘माझी बायगो’ हे गाणं सगळ्यात हिट गेलं त्याचे आता १५० मिलियन व्ह्युज आहेत तर २०२२ ला मी केलेलं ‘आपलीच हवा’ या गाण्याला एका दिवसात सगळ्यात जास्त व्ह्युज मिळाले होते. त्यानंतर २०२३ ला हार्टब्रेक झाला हे त्यावर्षातल माझ सगळ्यात हिट गाणं होत. आणि यावर्षी २०२४ ला मी मराठी म्युझिकवर प्रेम करणाऱ्या रसिक प्रेक्षकांसाठी ‘नखरेवाली’ हे गाणं घेऊन आलो आहे. या गाण्यावर प्रेक्षक मायबाप सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप प्रेम देत आहेत. त्यांचं असच प्रेम कायम मिळो.”